बुद्धीस्ट पर्यटन वार्षिक महोत्सव
By Admin | Published: February 19, 2017 12:20 AM2017-02-19T00:20:12+5:302017-02-19T00:20:12+5:30
प्रतिवर्षानुसार नुकतेच गोंदिया जिरूटोला येथील लुम्बीनी परिसरातील नदी घाटावर वार्षिक बुद्धीस्ट पर्यटन महोत्सव घेण्यात आले.
संगीताचा घेतला लाभ: तीन राज्यांतील नागरिकांची हजेरी
गोंदिया : प्रतिवर्षानुसार नुकतेच गोंदिया जिरूटोला येथील लुम्बीनी परिसरातील नदी घाटावर वार्षिक बुद्धीस्ट पर्यटन महोत्सव घेण्यात आले. यावेळी हजारो पर्यटकांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड येथील पर्यटकांची मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. जबलपूरच्या भेळाघाटची संक्षिप्त प्रतीकृती असल्याने पर्यटकांनी आनंद लुटला.
कार्यक्रमाची सुरूवात डॉ. तिस्सवंश, भदन्त धम्मशिखर, भदन्त नागसेन, भदन्त बुध्दशिल व भदन्त जनमीत्र यांच्या पूजा वंदनेने झाली. आ. गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते महोत्सव व स्मृती भवनाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी पर्यटन समिती अध्यक्ष अॅड.एच.डी.सूर्यवंशी, प्रबोधनकार डॉ.एन.व्ही.ढोके, वामनराव सरकटे, महाराष्ट्र राज्य पर्यटन समिती सदस्य शेख झकीर हुसेन उपस्थित होते. शेख यांनी पर्यटन स्थळ विकासाकरीता शासकीय जागा व किमान एक कोटी द्यावे असा असा ठराव मांडला. समितीचे अध्यक्ष अॅड. सूर्यवंशी यांनी अनुमोदन दिले. आ. गोपालदास अग्रवाल यांनी या पर्यटन स्थळाच्या विकासाकरीता कसलीही कसर सोडणार नाही असे आश्वासन दिले.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुस्तके, मुर्ती, आवश्यक वस्तू आणि अल्पोपहाराचे स्टॉल लागल्याने स्थळाला महाजत्रेचे स्वरूप आले होते. या महोत्सवात डहाट जोडप्यांचा विवाह लावून देण्यात आला. प्रबोधनकार संविधान भारती व वाद्यवृंद नागपूर यांचा संगीतमय कार्यक्रम झाला.
संचालन समिती सहसचिव डॉ.सी.आर.टेंभूर्णे व आभार सचिव प्रभाकर राजभीये यांनी मानले. यशस्वीतेसाठी केशोराव वाहणे, दुर्योधन गजभिये, राजेश मेश्राम, डॉ. माधवराव कोटांगले, भिमराज वासनिक, प्रभाकर गजभिये, डॉ.सी.आर.टेंभूर्णे, डॉ. मनोज राऊत, नरेश बोंबार्डे, जनकदास डहाट, तिर्थराज डहाट, अशोक चव्हाण, प्रितम मेश्राम, आनंद लांजेवार यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)