पेट्रोल डिझेल दरवाढीच्या फटक्यांनी सर्वसामान्यांचे बजेट आऊट ऑफ कंट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:30 AM2021-01-19T04:30:57+5:302021-01-19T04:30:57+5:30

गोंदिया : मागील पाच वर्षांच्या कालावधीत पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये ३२ रुपयांनी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ...

The budget of the general public is out of control due to the impact of petrol and diesel price hike | पेट्रोल डिझेल दरवाढीच्या फटक्यांनी सर्वसामान्यांचे बजेट आऊट ऑफ कंट्रोल

पेट्रोल डिझेल दरवाढीच्या फटक्यांनी सर्वसामान्यांचे बजेट आऊट ऑफ कंट्रोल

Next

गोंदिया : मागील पाच वर्षांच्या कालावधीत पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये ३२ रुपयांनी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट आऊट ऑफ कंट्रोल झाले आहे. पूर्वी पेट्राेल-डिझेल आणि गॅस सिलिंडरचे दर वाढले की त्याचा रस्त्यावर उतरून विरोध केला जात होता; पण आता तेवढ्या आक्रमकपणे आंदोलन होत नाही. महाविकास आघाडीने नुकतेच निवेदन देऊन याचा निषेध नोंदविला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोंडीवरून ठरतात. या किमती नियंत्रणात ठेवणे हे केंद्र सरकारवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. मात्र, पाच वर्षांपूृर्वी ६३.१९ पैसे असणाऱ्या पेट्रोलचा दर आता ९२.४१ पैशांवर पोहोचला आहे. त्यामुळे पाच वर्षांत पेट्रोलचा दर तब्बल ३२ रुपयांनी वाढला आहे. या दरवाढीमुळे वाहतूक भाड्यात वाढ होत असून, जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. परिणामी महागाईत वाढ होत असून, याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचे चित्र आहे.

.....

वाहतूक भाड्यात वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने याचा सर्वाधिक परिणाम हा वाहतुकीवर होतो. वाहतुकीच्या दरात वाढ झाल्याने सहजच महागाईच्या दरात वाढ होते. भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतात. त्यामुळे याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होतो. ज्या तुलनेत पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढतात त्या तुुलनेत सर्वसामान्यांचे उत्पन्न वाढत नाही आणि मजुरीच्या दरातसुद्धा वाढ होत नाही, त्यामुळे याचा सर्वाधिक फटका त्यांना बसतो.

........

सर्वांची ऑनलाइन नोंद

गोंदिया शहरात दररोज २० ते २५ हजार लिटर पेट्रोल आणि डिझेलची विक्री होते. रिलायन्स, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम या चार प्रमुख कंपन्यांमार्फत पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केला जाताे. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज बदलण्याचा निर्णय घेतल्यापासून सर्वच पेट्रोल पंप ऑनलाइन जोडण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री १२ वाजेनंतर मशीनवर आपोआपच दर बदलतात, तसेच पेट्रोल, डिझेलचा सर्वच व्यवहार ऑनलाइन ठेवला जातो.

....

कोट

केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. परिणामी महागाई चारपट वाढली आहे. याचा सर्वसामान्यांना सर्वाधिक फटका बसत आहे. दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ असून, यावर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या विरोधात काँग्रेसच्या माध्यमातून लवकरच आंदोलन छेडले जाईल.

- नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष काँग्रेस.

......

पेट्रोल-डिझेल अत्यावश्यक वस्तूत मोडते. त्यामुळे त्यांच्या दरात वाढ झाल्याने याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होतो. महागाई वाढण्यामागे पेट्रोल- डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने होणारी भावभाव हे प्रमुख कारण आहे. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर अनुदान देऊन या किमती नियंत्रणात ठेवू शकते. मात्र, एकीकडे जनतेला सहानुभूती दुसरीकडे याकडे दुर्लक्ष करीत आहे.

- पंचम बिसेन, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

.......

पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये झालेली वाढ

जानेवारी २०१७ ६३.१९

५५.००

जानेवारी २०१८ ६९.९२

५७.१०

जानेवारी २०१९ ७१.०५

६५ रुपये

जानेवारी २०२० ७६.१०

७०.००

जानेवारी २०२१ ९२.४१

८२.१०

Web Title: The budget of the general public is out of control due to the impact of petrol and diesel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.