वैनगंगा नदीवर पूल तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:09 AM2017-11-17T00:09:42+5:302017-11-17T00:10:10+5:30
लगतच्या मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरील वैनगंगा नदीवर पूल तयार करण्यात यावे. या मागणीसाठी येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाºयांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची ....
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लगतच्या मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरील वैनगंगा नदीवर पूल तयार करण्यात यावे. या मागणीसाठी येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाºयांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची ते गोंदिया येघे आले असता बुधवारी (दि.१५) त्यांची भेट घेवून निवेदन दिले.
मुख्यमंत्री चव्हाण गोंदियात आले असता भाजप पदाधिकाºयांनी माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वात त्यांनी बिरसी विमानतळ येथे भेट घेतली.
या भेटीत अग्रवाल यांच्यासह अन्य पदाधिकाºयांनी मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यांतर्गत येत असलेल्या वारासिवनी तालुक्यात नदी काठावर असलेल्या ग्राम साखडी व बेनी तसेच महाराष्ट्र राज्यातील गोंदिया तालुत्यांतर्गत असलेल्या ग्राम डांर्गोली या मार्गावर रस्ते वाहतूक सुरू करण्यासाठी वैनगंगा नदीवर पूल तयार करण्याची मंजूरी द्यावी अशी मागणी केली.
अग्रवाल यांनी, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील या गावांत व्यापार होत असून वाहतुकीची सुविधा नसल्यामुळे लोकांना वारासिवनी येथे जावे लागते. त्यामुळे सुमारे ६५ किमीचे अंतर फिरुन यावे लागते. अशात या गावांना जोडण्यासाठी वैनगंगा नदीवर पूल तयार केल्यास दोन्ही राज्यातील लोकांना याचा फायदा होण्यार असल्याचे सांगितले. यावर मुख्यमंत्री चव्हाण यांनी, दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकाºयांशी चर्चा करून या यावर त्वरीत तोडगा काढण्याचे निर्देश दिले.
सारस संरक्षणासाठी विशेष योजनेची मागणी
या भेटीत अग्रवाल यांच्यासह अन्य पदाधिकाºयांनी गोंदिया व बालाघाट या दोन्ही जिल्ह्यांना लाभलेल्या दुर्मिळ सारस पक्ष्याचा विषय मांडला. अग्रवाल यांनी शांतीचा प्रतीक म्हणून ओळख असलेल्या सारस पक्ष्याच्या संरक्षणासाठी विशेष योजना राबविण्याची मागणी केली. सारस पक्ष्याला बघण्यासाठी पक्षी प्रेमी येत असतात. त्यामुळे पर्यटनाला वाव मिळावा तसेच ग्रामीणांना सारस संरक्षणासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी विशेष योजना राबविण्याची मागणी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे केली.