छुप्या पद्धतीने व्यापारी गाळे बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 10:00 PM2018-05-05T22:00:08+5:302018-05-05T22:00:08+5:30
नगर परिषद परिक्षेत्रात जिल्हा परिषदेने स्थानिक शासकीय यंत्रणांना डावलून आपल्या अडेलतट्टू धोरणाने व्यापारी गाळे बांधकाम नियोजन प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र सदर बांधकाम रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : नगर परिषद परिक्षेत्रात जिल्हा परिषदेने स्थानिक शासकीय यंत्रणांना डावलून आपल्या अडेलतट्टू धोरणाने व्यापारी गाळे बांधकाम नियोजन प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र सदर बांधकाम रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली जात आहे. व्यापारी गाळे बांधकाम अनाधिकृतपणे होत असल्याचे आता या विभागाचे अधिकारीच सांगत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची शासनाने गांर्भियाने दखल घेवून वेळीच पाऊले उचलण्याची गरज आहे.
आमगाव नगर परिषद परिक्षेत्रात बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रशस्त इमारत आहे. या रुग्णालयातून रुग्ण सेवा नियमित सुरु आहे. आपल्या उत्कृष्ट सेवेसाठी आरोग्य केंद्राने राज्य शासनाचे अनेक पुरस्कार मिळविले आहे. परंतु याच आरोग्य केंद्रातील मुलभूत सुविधांचा विचार न करता राजकीय पुढाºयांनी आरोग्य केंद्रातील भूखंडावर वक्रदृष्टी आहे.
शासनाच्या आरोग्य सेवांच्या विस्तारीकरणाला गती देण्याचे धोरण असताना रुग्णालय सेवा प्रभावित करुन या ठिकाणी व्यापाºयांचे साम्राज्य स्थापित करण्यासाठी जिल्हा परिषद गोंदिया येथील काही पदाधिकारी व सदस्यांनी पाऊल उचलल्याचा आरोप आहे. त्यामुळे या परिक्षेत्रात रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषदेच्या काही पदाधिकाºयांनी स्थानिक प्रशासन व नियोजनाला डावलून व्यापारी गाळे बांधकामाला सुरूवात केली आहे. परंतु परिक्षेत्रात व्यापारी गाळ्यांसाठी नियोजित जागा उपलब्ध नसूनही वेगळ्याच भूखंडात छुप्या पद्धतीने अनाधिकृत बांधकाम केले जात आहे. रुग्णालयाच्या मागील बाजूस कर्मचाºयांची वसाहत आहे. याच वसाहतीच्या आवार भिंतीला खिंडार पाडून आतमध्ये गाळ्यांचे बांधकाम सुरु असल्याची बाब पुढे आली आहे.
शासनातर्फे ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र आमगाव येथील वाढती लोकसंख्या आणि या गावाला लागून असलेली दोन राज्यांची सीमा लक्षात घेता या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाची मागणी आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र भूखंडावर उपजिल्हा रुग्णालयाची तयार करण्यात यावे. यासाठी नागरिकांच्या मागणीला शासन दरबारी रेटून धरण्यात आले आहे.
व्यापारी गाळे नियमबाह्य
आमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बांधकाम करण्यात येत असलेले व्यापारी गाळे नियमबाह्य असल्याची कबुली अधिकारी देत आहेत. मात्र ही बाब माहिती असून सुध्दा कारवाही करता येत नसल्याचे एका अधिकाºयांने सांगितले. त्यामुळे या संदर्भात नागरिकांनी शासनाकडे तक्रार केली आहे.