विवाह सोहळ्यातून समाज घडवा

By admin | Published: May 6, 2017 12:57 AM2017-05-06T00:57:21+5:302017-05-06T00:57:21+5:30

कोणत्याही समाजाची बांधणी म्हणजे संघटन मजबूत होणे ही काळाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जसा समाज घडवला

Build a society from marriage | विवाह सोहळ्यातून समाज घडवा

विवाह सोहळ्यातून समाज घडवा

Next

श्रावण राणा : हलबा हलबी समाज सामूहिक विवाह सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : कोणत्याही समाजाची बांधणी म्हणजे संघटन मजबूत होणे ही काळाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जसा समाज घडवला तसाच त्यांच्या विचारांचा समाज घडवा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्रावण राणा यांनी केले.
हलबा-हलबी समाजाच्यावतीने कुंभीटोला येथे आयोजीत समाजाच्या सामूहिक विवाह सोहळयात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. य विवाह सोहळ््याचे उद्घाटन अभियंता बी.टी. राऊत (अमरावती) व माजी आमदार रामरतन राऊत यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार दयाराम कापगते, डॉ. नामदेव किरसान, महाप्रबंधक आर.एम. कोजबे, प्रा. डॉ. रामकुमार प्रधान (मुंबई), टि.के. मारगाये , डॉ. देवकुमार राऊत (उस्मानाबाद), सुनील ईस्वार (यवतमाळ), मनोहर चंद्रिकापुरे, ओ.एम. जमदाळ, डॉ. कुलदीप बघेले, डॉ.देवेंद्र घरतकर, जि.प. सदस्य गिरीष पालीवाल, जि.प.सदस्य सुरेखा नाईक, सरपंच पदमा राठोड, उपसरपंच महेंद्र जुगनाके, लिलाधर ताराम, बंबू भंडारी, पो.पा. आशा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
या विवाह सोहळ््याचे हे १९ वे वर्ष आहे होते यंदा या सोहळ््यात ३२ जोडपी विवाहबद्ध झाली. या विवाह सोहळ््यात परिणयबद्ध झालेल्या जोडप्यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यासाठी शाखा अध्यक्ष तानेश ताराम, सचिव तुलाराम मारगाये, आबाजी किरसान, शामलाल चरजे, रामू अवरासे, नरहरी ताराम, वासुदेव अवरासे व कुंभीटोलावासीयांनी सहकार्य केले.
 

Web Title: Build a society from marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.