१४ वर्षांपासून जीर्ण झालेली इमारत पाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 05:00 AM2020-09-06T05:00:00+5:302020-09-06T05:00:00+5:30

नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. जीर्ण इमारत असलेल्या मालमत्ताधारकांना नोटीस देऊन इमारत पाडण्यास सांगीतले जाते. त्यानुसार दिलीप अग्रवाल यांच्या मालकीची गौशाला वॉर्डातील एक इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सन २००६ पासून नियमितपणे नोटीस बजावले जात होते. मात्र त्यांनी ही इमारत पाडली नाही.

A building that has been dilapidated for 14 years was demolished | १४ वर्षांपासून जीर्ण झालेली इमारत पाडली

१४ वर्षांपासून जीर्ण झालेली इमारत पाडली

googlenewsNext
ठळक मुद्देनगर परिषदेची कारवाई : २००६ पासून देत होते नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जीर्ण झालेली इमारत कधीही पडून कुणाच्या जीवीताला धोका निर्माण होवू नये यासाठी नगर परिषदेकडून सन २००६ पासून इमारत मालकाला नोटीस बजाविण्यात येत होते. मात्र मालमत्ता धारकाने इमारत न पाडल्याने अखेर नगर परिषदेने शनिवारी (दि.५) ही इमारत पाडली.
मलाड येथे काही दिवसांपूर्वी जीर्ण इमारत कोसळून चार जणांचा जीव गेला.पावसाळ््यात जीर्ण इमारतींच्या पडझडीचे प्रकार दरवर्षी घडतात. त्यादृष्टीने नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. जीर्ण इमारत असलेल्या मालमत्ताधारकांना नोटीस देऊन इमारत पाडण्यास सांगीतले जाते. त्यानुसार दिलीप अग्रवाल यांच्या मालकीची गौशाला वॉर्डातील एक इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सन २००६ पासून नियमितपणे नोटीस बजावले जात होते. मात्र त्यांनी ही इमारत पाडली नाही.
यंदा मात्र पावसाने चांगलाच कहर केला.त्यात या इमारतीचा एक भाग खचल्याची माहिती आहे. अशात ही इमारत पडून जीवीतहानीचा धोका लक्षात मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी ही इमारत पाडण्याचे आदेश अतिक्रमण निर्मुलन पथकाला दिले.मुख्याधिकारी चव्हाण यांच्या उपस्थितीत पथकातील सदस्य नगर अभियंता डॉली मदान, उपअभियंता रविंद्र कावडे, अनिल दाते, कनिष्ठ अभियंता मनिष जुनघरे, रचना सहायक प्रतीक नाकाडे, वीज अभियंता विवेक सरपे, स्वच्छता निरीक्षक मुकेश शेंद्रे, विधी पर्यवेक्षक संतोष ठावरे, वरिष्ठ लिपीक मुकेश मिश्रा व सलाम कुरेशी यांनी शनिवारी (दि.५) इमारत पाडण्याची कारवाई केली. विशेष म्हणजे आठवडाभरापूर्वीच लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित करुन नगर परिषदेचे याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Web Title: A building that has been dilapidated for 14 years was demolished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.