घरफोडीतील आरोपी अद्याप मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:34 AM2021-02-17T04:34:52+5:302021-02-17T04:34:52+5:30
तिरोडा : तिरोडा शहरासह ग्रामीण भागातही चोरी व घरफोडीच्या घटना वाढत आहेत. नोव्हेंबर, २०२० मध्ये येथील सैनिक कॉलनीतील देवानंद ...
तिरोडा : तिरोडा शहरासह ग्रामीण भागातही चोरी व घरफोडीच्या घटना वाढत आहेत. नोव्हेंबर, २०२० मध्ये येथील सैनिक कॉलनीतील देवानंद शहारे यांच्या घरातून लाखो रुपयांचे दागिने चोरून पसार झालेले चोर मोकाट आहेत. यानंतरही घरफोडीची अनेक प्रकरणे घडली. मात्र, तिरोडा पोलीस चोरांना पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.
तिरोडा शहरात चोरींच्या घटनांमध्ये मध्ये वाढ होत आहे. सध्या घराला कुलूप लावून रात्रभरासाठीही इतरत्र जाणे कुटुंबीयांना महाग पडत आहे. ज्या घराला कुलूप लागलेले असते, त्या घरी चोरी होण्याचे सत्र शहरात सुरू आहे. शहरातील नेहरू वॉर्डातील सैनिक कॉलनीत शहारे यांच्या घरातून चोरांनी रोख रकमेसह लाखो रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला होते. २२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान घडलेल्या या घटनेला ३ महिन्यांचा काळ लोटत आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप एकाही चोराला पकडले नसल्याने घरफोडी प्रकरणांच्या तपासाकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. तिरोडा तालुका पत्रकार संघाने पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांना १९ डिसेंबर, २०२० रोजी निवेदन देऊन या घरफोडी प्रकरणातील चोरांना त्वरित पकडण्याची मागणी केली होती. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. या घटनेच्या १५ दिवसांनंतर जुन्या वस्तीत २ घरफोड्या झाल्या होत्या. त्यानंतर, ग्राम करटी येथे एकाच रात्री ३ घरफोड्या झाल्या, तर पूर्वीच्या ७ घरफोड्यांचा तपासही थंडबस्त्यात आहे. त्यामुळे घरफोडी प्रकरणातील चोरांना पकडण्यास तिरोडा पोलिसांना ॲलर्जी का, असा सवाल उपस्थित होत आहे. अवैध दारू विक्रेत्यांना पकडले जाते, मोटारसायकल चोरांना पकडले जाते, पण घरफोडी करून पसार झालेल्या चोरांना पकडले जात नाही, असा सवाल शहरवासीय करीत आहेत.
बॉक्स
चारदा बदलले तपास अधिकारी
शहारे यांच्या घरफोडीचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. डमाळे यांची बदली होऊन योगेश पारधी हे तिरोडा पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी हे तपासकार्य स्वतःकडे घेतले. काही दिवसांनी त्यांनी या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे यांच्याकडे सोपविला. त्यानंतर, या प्रकरणाच्या तपास कार्याची धुरा पोलीस उपनिरीक्षक हणवते यांच्याकडे सोपविण्यात आला.