रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन

By admin | Published: May 13, 2017 01:35 AM2017-05-13T01:35:06+5:302017-05-13T01:35:06+5:30

भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी काढलेल्या अपमानास्पद शब्दामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे

The burning of the statue of Raosaheb Danve | रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन

रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन

Next

शेतकऱ्यांची थट्टा : शिवसेनेकडून मोर्चा काढून निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी काढलेल्या अपमानास्पद शब्दामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे यांच्या आदेशानुसार सडक-अर्जुनी शिवसेना तालुका समितीच्यावतीने रावसाहेब दानवे यांचा पुतळा बनवून त्यांचे सामूहिक दहन करण्यात आले.
‘तूर खरेदी केली, तरी रडतात साले’ या शब्दाचा वापर करून शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या रावसाहेब दानवेवर योग्य ती कारवाई व्हावी, यासाठी जागोजागी त्यांचा निषेध करण्यात येत आहे. तिच भूमिका घेऊन सडक-अर्जुनी शिवसेना तालुका प्रमुख सदु विठ्ठले यांच्या नेतृत्वात रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका उपप्रमुख प्रदीप कुंभरे, नामदेव फुंडे, महादेव शिवणकर, ताराचंद हर्षे. उमेश राऊत, कैलास चांदेवार, युवराज गोबाडे, विष्णू रोखडे, सारंग विठ्ठले, मंगेश भेंडारकर, विष्णू गायधने, विनोद राऊत, लालदास राऊत, वंदना डोळे, रेशमा गोबारे, यशवंत गोंढवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: The burning of the statue of Raosaheb Danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.