साडेतीन एकरातील धानाचे पुंजणे जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 09:03 PM2018-11-10T21:03:41+5:302018-11-10T21:04:09+5:30

आमगाव तालुक्यातील ग्राम वळद येथील तीन शेतकऱ्यांच्या साडे तीन एकर शेतात ठेवलेले धानाचे पुंजणे जळून खाक झाले. यामुळे या तिन्ही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी द्वारपाल श्रावणजी भगत यांच्या १ एकर ६० डिस्मील, ललीता शिशुपाल भगत यांच्या १.७ एकर तर आनंदराव सेवकराम परिहार यांच्या १.३० एकरातील धानाचे पुंजणे त्यांनी ठेवले होते.

Burnt of fire was burned in three and a half | साडेतीन एकरातील धानाचे पुंजणे जळाले

साडेतीन एकरातील धानाचे पुंजणे जळाले

Next
ठळक मुद्देवळद येथील घटना : तीन शेतकऱ्यांचे दीड लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आमगाव तालुक्यातील ग्राम वळद येथील तीन शेतकऱ्यांच्या साडे तीन एकर शेतात ठेवलेले धानाचे पुंजणे जळून खाक झाले. यामुळे या तिन्ही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकरी द्वारपाल श्रावणजी भगत यांच्या १ एकर ६० डिस्मील, ललीता शिशुपाल भगत यांच्या १.७ एकर तर आनंदराव सेवकराम परिहार यांच्या १.३० एकरातील धानाचे पुंजणे त्यांनी ठेवले होते. शुक्रवारी (दि.९) दुपारी १२.३० वाजतादरम्यान अचानक पुंजण्याला आग लागली ते जळून खाक झाले.
या घटनेत शेतकऱ्यांचे दिड लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य जियालाल पंधरे, सरपंच किशोर रहांगडाले, पोलीस पाटील संतोष नागपुरे यांनी तिन्ही शेतकऱ्यांच्या जळालेल्या पुंजण्याची पाहणी केली.
तलाठी डोये यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा तयार केला. पंधरे यांनी भ्रमणध्वनी द्वारे तहसीलदार साहेबराव राठोड व सालेकसा पोलीस ठाण्यात माहिती दिली.
नुकसान भरपाईचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषद कृषी विभागाला देण्यात यावे व शेतकऱ्यांना जिल्हा परिषदमधून नुकसान भरपाई मिळवून देण्यात प्रयत्न करणार असल्याचे पंधरे म्हणाले

Web Title: Burnt of fire was burned in three and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग