बसची दुचाकीला धडक दोन जण ठार, एक गंभीर, देवरी-आमगाव मार्गावरील लोहारा गावातील घटना
By अंकुश गुंडावार | Updated: September 18, 2023 13:11 IST2023-09-18T13:10:41+5:302023-09-18T13:11:03+5:30
Accident: बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण ठार तर एक जण गंभीर झाल्याची घटना देवरी-आमगाव मार्गावरील लोहाराजवळ सोमवारी (दि.१८) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

बसची दुचाकीला धडक दोन जण ठार, एक गंभीर, देवरी-आमगाव मार्गावरील लोहारा गावातील घटना
- अंकुश गुंडेवार
लोहारा - बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण ठार तर एक जण गंभीर झाल्याची घटना देवरी-आमगाव मार्गावरील लोहाराजवळ सोमवारी (दि.१८) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. अपघातात ठार व जखमी झालेले व्यक्ती हे देवरी तालुक्यातील पुराडा येथील असल्याची माहिती असून त्यांची ओळख पटविली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार दुचाकी स्वार हे कारुटोला, पुराडा येथून दुचाकी क्र. एमएच ३५, एन ५०१६ ने देवरीकडे जात होते. दरम्यान एसटी बस क्रमांक एमएच ०७, सी ९३०७ ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार दोघांचा घटनास्थळीच मृत्यु झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. या मार्गावरुन जात असलेल्या नागरिकांनी जखमीला देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तसेच या घटनेची माहिती देवरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच देवरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा तपास पोलिस स्टेशन देवरी येथील शिपाई गुणवंत कठाने करीत आहे.