प्रवाशांच्या गर्दीने बसस्थानके फुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:00 PM2017-10-15T22:00:35+5:302017-10-15T22:00:48+5:30
दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाºया प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने शहरातील राज्य परिवहन महामंडळाची बसस्थानके फुलू लागली आहेत. रेल्वे स्टेशन व बसस्थानकांवर प्रवाशांची सकाळपासूनच गर्दी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाºया प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने शहरातील राज्य परिवहन महामंडळाची बसस्थानके फुलू लागली आहेत. रेल्वे स्टेशन व बसस्थानकांवर प्रवाशांची सकाळपासूनच गर्दी होत आहे. त्यानुसार एस.टी. प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्यांची व्यवस्थाही केली आहे.
दिवाळीपूर्वी येणाºया व सण आटोपून परत जाणाºयांची संख्याही जास्त आहे. बाहेरगावाहून गोंदिया येथे कामानिमित्त आलेल्या चाकरमान्यांना गावी जाण्याचे वेध लागले आहे. मुलांच्या सत्र परीक्षाही संपल्या आहेत. दुसरीकडे दिवाळीनिमित्त शाळांना सुट्या लागल्या आहेत. परिणामी मागील तीन दिवसांपासून बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
सकाळपासून विविध मार्गावर जाणाºया बसेससाठी प्रवाशांचा ओघ सुरु होता. काही ठिकाणी तिकिटांसाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. त्यातच काही बस उशीरा येत असल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत होते. गोंदिया बसस्थानकावरून अमरावती, गडचिरोली, नागपूर, वर्धा यासह जिल्ह्यांतर्गत ग्रामीण भागात जाणाºया गाड्यांमध्ये प्रवासी खच्चून बसल्याचे तथा उभे असल्याचे दिसून येत आहे.
दिवाळी हा मुख्य सण असल्याने गावाकडे जाणाºयांची संख्या या दिवसात वाढते. त्यामुळे आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. नेहमीपेक्षा रविवारी बसस्थानकावर गर्दी जास्त होती. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या गोंदिया आगाराच्यावतीने जादा बस गाड्या सोडण्यात येत आहेत. गर्दीमुळे सामान व लहान मुलांना सांभाळताना प्रवाशांची कसरत होत आहे. ज्या मार्गावर अधिक गर्दी आहे तेथे रापच्यावतीने तातडीने बस उपलब्ध करून दिली जात आहे.
रेल्वेगाड्या धावताहेत भरभरून
दिवाळीनिमित्त स्वगावी जाणाºया प्रवाशांमुळे प्रवाशी रेल्वेगाड्या भरभरून धावत आहेत. रविवारी (दि.१५) मुंबईवरून गोंदियाला येणाºया विदर्भ एक्स्प्रेसच्या साधारण डब्यांमध्ये पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रवाशांनी सामान्य तिकिट घेवून आरक्षित डब्यांतून प्रवास केला. त्यामुळे रेल्वे कर्मचाºयांनी त्यांच्याकडून प्रत्येकी १०० रूपयांचा दंडही वसूल केला. प्रवाशांनीही सदर दंडाची रक्कम देवून आरक्षित डब्यांमध्येच बसून गोंदियापर्यंत प्रवास केला. अशा गर्दीच्या परिस्थितीत रेल्वे कर्मचाºयांकडून प्रवाशांची लूट केली जात असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले आहे.