बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व्यापारी व नागरिक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 12:13 AM2018-06-01T00:13:45+5:302018-06-01T00:13:45+5:30
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या समर्थनार्थ सर्व बँक कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या संयुक्त मोर्चाच्या आवाहनावर बँक कर्मचाºयांनी ३० व ३१ मे रोजी बंद पुकारला. मात्र या संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होवून व्यापारी व नागरिक अडचणीत आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या समर्थनार्थ सर्व बँक कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या संयुक्त मोर्चाच्या आवाहनावर बँक कर्मचाºयांनी ३० व ३१ मे रोजी बंद पुकारला. मात्र या संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होवून व्यापारी व नागरिक अडचणीत आले आहेत.
बँक कर्मचारी-अधिकाºयांनी पुकारलेला संप बुधवारी (दि.३०) यशस्वी ठरला. सर्व बँकांच्या कर्मचारी-अधिकारी यांनी भारतीय स्टेट बँकेच्या गोंदियातील मुख्य शाखेसमोर एकत्र येवून जोरदार निदर्शने व नारेबाजी केली होती. त्यानंतर पुन्हा दुसºया दिवशी गुरूवारी (दि.३१) संप असल्यामुळे दैनंदिन व्यवहारासाठी बँकेत जाणाºया व्यापारी व ग्राहकांना मोठाच मनस्ताप झाला.
दैनंदिन खर्च, घर बांधकाम, मुलांच्या पुस्तका खरेदी करण्यासाठी नागरिकांना पैशांची गरज होती. शिवाय काही नागरिकांना आरटीजीएस व डिमांड ड्राफ्ट करावयाचे होते.
मात्र बँकाच बंद असल्याने नागरिकांची कोणतीही कामे होवू शकली नाही. पैशाअभावी अनेकांची कामे या दोन दिवसांत ठप्प पडली.
देशभरातील १० लाखांपेक्षा अधिक बँक कर्मचारी-अधिकारी आपल्या मागण्यांसाठी दोन दिवसीय संपावर गेले आहेत. आयबीए व शासनाच्या नकारात्मक धोरणामुळे त्यांच्यात रोष व्याप्त आहे. वेतन वाढ व इतर मागण्यांबाबत आयबीएद्वारे विलंब व अन्यायपूर्ण कार्यवाही केली जात असल्याचे त्यांचे म्हणणे असून त्यांनी या कार्यप्रणालीचा निषेध केला आहे.
नवतपाच्या वाढत्या उष्णतेतही एक तासपर्यंत उन्हात नारेबाजी करीत कर्मचाºयांनी रोष व्यक्त केला. यात युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील सर्व बँक कर्मचारी सहभागी झाले होते. मात्र त्यांच्या या संपामुळे व्यापाºयांसह सामान्य नागरिकसुद्धा अडचणीत सापडले. बँका सुरू होण्याची सर्वच वाट बघत आहेत.