ओपीडीच्या पैशांतून औषध खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 09:30 PM2018-10-14T21:30:15+5:302018-10-14T21:30:48+5:30
येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातंर्गत तालुक्यातील ५ प्राथमिक केंद्रांत मागील ६ महीन्यांपासून रोग प्रतीबंधक औषध उपलब्ध नाहीत. अशात रु ग्णांच्या सेवेकरीता आवश्यक असलेल्या औषधांची खरेदी ओपीडीच्या रक्कमेतून वैद्यकीय अधिकाऱ्यांना करावी लागत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातंर्गत तालुक्यातील ५ प्राथमिक केंद्रांत मागील ६ महीन्यांपासून रोग प्रतीबंधक औषध उपलब्ध नाहीत. अशात रु ग्णांच्या सेवेकरीता आवश्यक असलेल्या औषधांची खरेदी ओपीडीच्या रक्कमेतून वैद्यकीय अधिकाऱ्यांना करावी लागत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.
तालुक्यात ग्राम सोनी, चोपा, तिल्ली-मोहगाव, कुऱ्हाडी व कवलेवाडा हे ५ प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यांतर्गत उपकेंद्र आहेत. या केंद्रांत मागील ६ महिन्यांपासून औषध नाहीत. पावसाळा, हिवाळा व उन्हाळ््यात स्वच्छतेअभावी मोठ्या प्रमाणात विविध आजार गावागावांत फोफावतात. यावर नियंत्रण ठेवता यावे म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रांत औषधांचा पुरेपूर साठा असणे आवश्यक आहे. परंतु औषध पुरवठा होत नसल्याने गंभीर समस्या उदभवल्याची चर्चा होत आहे. औषधी साठा नसल्याने ओपीडीच्या रु ग्णावर प्राथमिक उपचार करने कठीण झाले आहे. मात्र लोकांच्या जीवाच्या जबाबदारी असल्याने रोग प्रतीबंधक जे औषध आवश्यक आहे ते बाहेरु न ओपीडीच्या पैशांतून केले जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, आवश्यक औषधांचा पुरवठा करणे, शासनाने लागू केलेल्या योजना राबवून घेणे व नियंत्रण ठेवण्याचे काम करणे जिल्हा परिषदेचे आहे. आरोग्य केंद्रात औषध तुटवड्याची माहीती सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रानी दिली आहे. तरी औषध पुरवठा करण्यात आलेला नाही. वरीष्ठांनी गोरगरीबांच्या आरोग्याची गंभीर बाब लक्षात घेत तात्काळ औषध पुरवठा करावा अशी मागणी नागरीकांनी केली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांना रु ग्णांची सेवा औषधांच्या तुटवड्यामुळे करता येत नाही. मात्र काही औषध खरेदी करु न रु ग्णसेवा सुरु आहे.
राधेशाम पाचे, तालुका वैद्यकीय अधिकारी, गोरेगाव