कॉमन लेपर्डला म्हणा आता बिट्टी आणि स्मॉल लेपर्डला छोटी बिट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 12:15 PM2019-12-09T12:15:34+5:302019-12-09T12:17:11+5:30

महाराष्ट्रत आढळणाऱ्या ‘कॉमन लेपर्ड’ या फुलपाखरास बिट्टी तर ‘स्मॉल लेपर्ड’ या फुलपाखरास छोटी बिट्टी अशी ओळख आता नव्याने दिली आहे.

Call Common Lepard now Bitty and Small Lepard as Bitty Bitty | कॉमन लेपर्डला म्हणा आता बिट्टी आणि स्मॉल लेपर्डला छोटी बिट्टी

कॉमन लेपर्डला म्हणा आता बिट्टी आणि स्मॉल लेपर्डला छोटी बिट्टी

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र जैवविविधता मंडळाचा उपक्र म केरळ नंतर देशातील दुसरे राज्यफुलपाखरांना मिळाली नवी मराठी ओळख

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र जैवविविधता मंडळच्या समितीने राज्यातील सहा कुळातील २७७ फुलपाखरांच्या इंग्रजी नावांना आता मराठी नावे दिली आहे. ही नावे देतांना फुलपाखरांचा रंग, ठिपके, प्रकार यासर्व गोष्टींचा अभ्यास करण्यात आला.राज्यातील फुलपाखरांचा अभ्यास हा ब्रिटिश काळात झाल्याने फुलपाखरांना ब्रिटिश कालीन नावे देण्यात आली होती. पण आता इंग्रजीतील कठीण नावाऐवजी स्थानिक मराठी नावे देण्यात आली आहेत.
राज्यातील पशू पक्ष्यांप्रमाणे स्थानिक भाषेत फुलपाखरांची देण्यात यावी. यामुळे फुलपाखरांचा अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे करण्यास मदत होईल. महाराष्ट्रत आढळणाऱ्या फुलपाखरांना स्थानिक नावांची ओळख मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्र जैवविविधता मंडळच्या समितीने राज्यातील विविध जैवविविधता अभ्यासक, तज्ञ, निसर्गप्रेमी व फुलपाखरांच्या अभ्यासकांना सूचना व नावे सुचविण्याचे आवाहन विविध माध्यमातून केले होते. पूर्व विदर्भात नवेगावबांध-नागझिरा अभयारण्य, ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा निसर्ग संपन्न परिसर आहे. या भागात सुध्दा फुलपाखरांच्या विविध प्रजाती आढळतात. त्यांचा अभ्यास सुध्दा काही पक्षी अभ्यासक आणि वन विभागाचे अधिकारी करीत आहेत. पूर्व विदर्भात आढळणाºया फुलपाखरांना वैर्द्भीय नावांची ओळख मिळावी म्हणून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनविभागात व सध्या भंडारा वनविभागात कार्यरत असलेले फुलपाखरांचे अभ्यासक, निसर्गप्रेमी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे यांनी काही स्थानिक फुलपाखरांची मराठी नावे महाराष्ट्र जैवविविधता मंडळाला सुचवली होती. यावर महाराष्ट्र जैवविविधता मंडळच्या समितीने अंतिम बैठकीत अंतिम रुप देतांना दोन फुलपाखरांची नावे स्विकारली आहेत. महाराष्ट्रत आढळणाऱ्या ‘कॉमन लेपर्ड’ या फुलपाखरास बिट्टी तर ‘स्मॉल लेपर्ड’ या फुलपाखरास छोटी बिट्टी अशी ओळख आता नव्याने दिली आहे.


मराठी नावांची व्हावी प्रचार प्रसिध्दी
राज्यातील फुलपाखरे आणि मराठी नावे याची माहिती देणारे पुस्तक छायाचित्रांसह नुकतेच प्रसिध्द केले आहे. फुलपाखरांना दिलेली नावे अधिकाअधिक प्रचिलत व्हावीत यासाठी विविध माध्यमांनी पुढाकार घेऊन ती सर्वांपर्यंत पोहचविण्याची गरज आहे.

नावे ठरवितांना या गोष्टींचा विचार
फुलपाखरांची मराठी नावे ठरवितांना त्यांचे रंग, रुप, आकार, अंगावरील ठिपके, वागणूक ईत्यादी बाबीवरु न सर्व नावे ठरविण्यात आली आहेत. तसेच मंडळाने सुध्दा यासर्व गोष्टींचा विचारकरुन नावाना मंजुरी दिल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या समितीने फुलपाखरांना मराठी नावे देण्यासाठी, तसेच ही नावे स्थानिक असल्यास ओळखण्यास अधिक मदत होईल. यासाठी नावे मराठी नावे पाठविण्याचे आवाहन केले होते.पूर्व विदर्भात आढळणाºया फुलपाखरांची दोन मराठी नावे आपण मंडळाकडे पाठविली होती. या नावांना मंडळाने मंजुरी दिली असून ‘कॉमन लेपर्ड’ या फुलपाखरास बिट्टी तर ‘स्मॉल लेपर्ड’ या फुलपाखरास छोटी बिट्टी अशी ओळख आता मिळणार आहे.
- संजय मेंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा.

Web Title: Call Common Lepard now Bitty and Small Lepard as Bitty Bitty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.