समस्या सोडविण्यासाठी ‘ऑन कॉल सर्विस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:27 PM2019-08-05T23:27:39+5:302019-08-05T23:28:35+5:30

समाजाच्या मुख्यप्रवाहात दिव्यांगांनाही महत्त्वाचे स्थान प्राप्त व्हावे, त्यांच्या प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानाने ‘आॅन कॉल सर्विस’हा उपक्रम सन २०१८-१९ या सत्रापासूनच सुरू केला. वर्षभर या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असून मागील वर्षी ७६८ दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यात आल्या आहेत.

'Call service' for troubleshooting | समस्या सोडविण्यासाठी ‘ऑन कॉल सर्विस’

समस्या सोडविण्यासाठी ‘ऑन कॉल सर्विस’

Next
ठळक मुद्देसमग्र शिक्षा अभियानाचा उपक्रम : वर्षभरात ७६८ दिव्यांगांच्या मदतीसाठी धावले

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : समाजाच्या मुख्यप्रवाहात दिव्यांगांनाही महत्त्वाचे स्थान प्राप्त व्हावे, त्यांच्या प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानाने ‘आॅन कॉल सर्विस’हा उपक्रम सन २०१८-१९ या सत्रापासूनच सुरू केला. वर्षभर या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असून मागील वर्षी ७६८ दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यात आल्या आहेत.
सामान्य विद्यार्थ्यांसह दिव्यांग विद्यार्थीही शिक्षण घेतात. दिव्यांगांसाठी वेगळे शिक्षक नसल्याने त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिकविलेली एखादी गोष्ट लक्षात येत नाही. त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात ही बाब आली किंवा नाही हे त्या शिक्षकाच्या लक्षात सहज येते. ती गोष्ट त्या दिव्यांगाला पटावी व समजावी यासाठी समग्र शिक्षा अभियानतर्फे सन २०१८-१९ या सत्रापासून ‘आॅन कॉल सर्विस’ सुरू करण्यात आली. दिव्यांगांचे विषय शिकविणारे जिल्ह्यात ५८ शिक्षक आहेत. त्या ५८ शिक्षकांच्या माध्यमातून जिल्हाभर या विद्यार्थ्यांना शिकविण्यास मदत होते.
एखाद्या शिक्षकाने दिव्यांग विद्यार्थ्याची समस्या ‘कॉल’ करून सांगितल्यास अवघ्या अर्ध्या तासात विद्यार्थ्यांपर्यंत दिव्यांगांचे विषय शिक्षक पोहचतात. जे शिक्षक त्या परिसरात जवळ असेल ते शिक्षक त्या ठिकाणी जाऊन त्या समस्येचे निराकरण करतात.
जिल्हा समन्वयक स्वत: त्या ठिकाणी जाऊन समाधान करतात. समग्र शिक्षा अभियानाकडून दिव्यांगांना गरजेनुसार विविध साहित्य देण्यात येतात. जे दिव्यांग स्वत:च्या बळावर शाळेत येऊ शकत नाही त्यांना मदतनिस भत्ता व दिव्यांगांच्या गावात शाळा नसेल तर त्यांना प्रवास भत्ताही देण्यात येते.
दिव्यांगांच्या सर्व समस्यांच्या निराकरणासाठी ‘आॅन कॉल सर्विस’ ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत आहे. मुकाअ डॉ.राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनात ही सेवा अविरत सुरू आहे.
७६८ दिव्यांगांचे केले समाधान
सन २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील ७६८ दिव्यांगांना समस्या आल्या होत्या. त्या सर्व समस्यांच्या निराकरणासाठी समग्र शिक्षा अभियानातील दिव्यांग विभागाचे समन्वयक विजय ठोकणे व ५८ शिक्षकांनी तत्पर सेवा देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. जिल्हा समन्वयक ठोकणे यांनी ३४ ठिकाणच्या समस्यांचे निराकरण केले. ५८ शिक्षकांनी उर्वरीत दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी भेटी दिल्या. आमगाव तालुक्यातील ११५, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १४, देवरी तालुक्यातील ११९, गोंदिया १०७, गोरेगाव ५९, सडक-अर्जुनी १६८, सालेकसा ६९, तिरोडा ११७ दिव्यांगांना सेवा देण्यात आल्या आहेत.

दिव्यांग विद्यार्थ्यांना कसलीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी ‘आॅन कॉल सर्विस’ सुरू करण्यात आली. समस्या आल्यास अवघ्या अर्ध्या तासातच त्या समस्येचे निराकरण करण्यात येते.
-विजय ठोकणे, समन्वयक, समग्र शिक्षा अभियान, जि.प.गोंदिया.

Web Title: 'Call service' for troubleshooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.