कॅमेरे लागले पण जनरेटर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 11:57 PM2019-07-25T23:57:33+5:302019-07-25T23:57:56+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले मात्र रु ग्णालयातील जनरेटर गेल्या सहा वर्षांपासून बंद आहे. बुधवारी वीज नसताना बाळंत झालेल्या महिला आपल्या चिमुकल्यांना हवा करताना दिसून आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले मात्र रु ग्णालयातील जनरेटर गेल्या सहा वर्षांपासून बंद आहे. बुधवारी वीज नसताना बाळंत झालेल्या महिला आपल्या चिमुकल्यांना हवा करताना दिसून आल्या. त्यामुळे आरोग्य प्रशासन रु ग्णांप्रती किती जागरूक आहे याची अनुभूती आली.
येथील ग्रामीण रु ग्णालय विविध कारणांनी सदैव चर्चेत असते. रुग्णालयातील जनरेटर शोभेचे साधन ठरले आहे. दोन जनरेटर आहेत यापैकी एक शल्यक्रि या कक्ष व दुसरा बाहेर आहे. मात्र हे दोन्ही जनरेटर गेल्या सहा वर्षांपूर्वीपासूनच बंद असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. गेल्या सहा वर्षांपासून कोणत्याच वैद्यकीय अधीक्षकांना जनरेटर दुरु स्तीची शक्कल सुचू नये याचे नवल वाटते. रु ग्णांना ही सेवा पुरविण्यासाठी देखभाल व दुरु स्ती अनुदानाचे काय केले जाते हे एक कोडेच आहे. या रु ग्णालयात सौरविद्युत संच आहे मात्र ती सुद्धा निकामी आहे. त्यातल्या त्यात बुधवारी वीज खंडीत असताना आपल्या नवजात बालकांना हवा करताना महिलांचे दृष्य मन हेलावणारे होते.
या रु ग्णालयात ८४ हजार ७२० रु पये खर्च करून नुकतेच १४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. मात्र अत्यंत निकडीच्या असलेल्या जनरेटर दुरु स्तीकडे वैद्यकीय अधीक्षकांचे लक्ष जाऊ नये ही अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. जनरेटरची उपलब्धता ही आपातकालीन व्यवस्था समजली जाते. कुटुंब नियोजन, प्रसूती, हर्निया यासारख्या शल्यक्रि या या रु ग्णालयात होतात. वीज पुरवठा खंडीत झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून शल्यक्रि या कक्षात एक जनरेटर ठेवले आहे. मात्र ते नादुरु स्त आहे. अशात चुकून शल्यक्रि या करताना वीज पुरवठा खंडित झाल्यास त्याच्या यातना रुग्णांना भोगाव्या लागतात. येथे काही वर्षांपासून सौरविद्युत आहे. मात्र वानरांनी सौरविद्युत संचाची वाहिनी तोडल्यामुळे ते निकामी झाले आहे. सौरविद्युत पुरवठा करणाऱ्या कंपनीकडे देखभाल दुरु स्तीची जबाबदारी असते. मात्र त्या कंपनीने अद्याप दुरु स्ती करून दिली नसल्याचे समजते. रुग्णालयात सौरविद्युत आहे म्हणून पर्यायी जनरेटरच्या व्यवस्थेकडे रु ग्णालय प्रशासनाने दूर्लक्ष केल्याचे जाणवते. या यंत्रणेला गांभीर्य कळू नये यापेक्षा दुर्दैव कोणते ?
उपजिल्हारु ग्णालयाचा दर्जा द्या
अर्जुनी-मोरगाव हे जिल्हा मुख्यालयापासून ८० किमी. अंतरावर असून जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला आहे. या तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र व दोन ग्रामीण रु ग्णालय आहेत. एखादा गंभीर रु ग्ण असेल तर त्याला गोंदिया येथेच हलवावे लागते. गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी सभापती उमाकांत ढेंगे यांनी त्यावेळी हा मुद्दा उचलून धरला होता. मात्र त्यावेळी राज्यात आघाडी सरकार होते. आता राज्यात युती सरकार आहे व ढेंगे हे भाजपचे तालुकाध्यक्ष आहेत. शिवाय ते माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. राज्यात युतीची सत्ता आली असताना एकदम त्यांना या बाबीचा विसरच पडला व ते केवळ माजी मंत्र्यांसोबत फिरण्यात मशगुल राहिले. नवीन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्याकडून जनतेला येथे उपजिल्हा रु ग्णालय निर्मितीच्या अपेक्षा आहेत.
जनरेटरची दुरु स्ती लवकरच
ग्रामीण रु ग्णालयात सौरविद्युत संच असल्याने जनरेटरची गरजच भासली नाही. मात्र वानरांनी ते तोडल्यामुळे अडचण भासू लागली. जनरेटर गेल्या सहा वर्षांपासून नादुरु स्त आहे हे खरे आहे. लवकरच त्याची दुरु स्ती केली जाईल. सौरविद्युत संच तुटला आहे त्यासंबंधाने कंपनीशी पत्रव्यवहार सुरू आहे. मानधन तत्वावर कर्मचारी हा राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेंतर्गत कार्यरत आहे. तो ग्रामीण रु ग्णालय प्रशासनाचा नाही अशी प्रतिक्रि या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अकिनवार यांनी लोकमतशी बोलताना दिली.
रु ग्ण कल्याण समिती नावापुरतीच
रु ग्णालय व रु ग्ण यांच्यामधील रु ग्ण कल्याण समिती ही महत्वाचा दुवा आहे. यासाठी शासनामार्फत एक समिती नेमली जाते. या रु ग्णालयात समिती आहे मात्र ती नावापुरतीच. या समितीने आजपर्यंत रु ग्णांचे कल्याण केल्याचे ऐकिवात नाही. ही समिती बहुधा डॉक्टरच चालवितात. औपचारिकता म्हणून सदस्यांच्या सह्या घेतल्या जातात. जनरेटर बंद असल्याची बाब या समितीच्या निदर्शनास का आली नाही अथवा डॉक्टरांनी हा गंभीर विषय कधीतरी समितीसमोर ठेवला का ? हा खरा प्रश्न आहे.
इमारत पडतेय अपुरी
ग्रामीण रु ग्णालयाची इमारत ही १९८१ ची आहे. या बांधकामाला तब्बल ३८ वर्षे पूर्ण झाली आहेत. ती तत्कालीन परिस्थितीनुसार बांधण्यात आली होती. मात्र आता दिवसेंदिवस रु ग्णांची संख्या वाढत आहे. कधीकधी तर पाय ठेवायला जागा राहात नाही. शिवाय रु ग्णालय प्रशासनाने प्रत्येक कक्षासमोर रु ग्ण व अभ्यागतांना बसण्यासाठी स्टीलच्या खुर्च्या लावल्या आहेत. त्यामुळे एका कक्षातून दुसºया कक्षाकडे ये-जा करताना अडचण होते. शिवाय कक्ष सुद्धा कमी पडतात. वैद्यकीय अधीक्षकांना बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने एका लहानशा खोलीत त्यांची व्यवस्था केली आहे. रु ग्णालयाचे प्रशासकीय कार्यालय अपुºया जागेत आहे. सर्व अडचणी लक्षात घेता रु ग्णालयाची नवीन वास्तू तयार करणे अगत्याचे झाले आहे.