भेसळखोरीला आळा घालण्यासाठी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 09:13 PM2018-11-04T21:13:56+5:302018-11-04T21:14:32+5:30

दिवाळी दरम्यान मिठाई व इतर खाद्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. मात्र काही विक्रेते अतिरिक्त नफा कमविण्यासाठी मिठाई व इतर पदार्थांमध्ये भेसळ करतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग भंडारातर्फे शोध मोहीम राबवून १७ विक्रेत्यांकडून पदार्थांचे नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे.

Campaign to stop adulteration | भेसळखोरीला आळा घालण्यासाठी मोहीम

भेसळखोरीला आळा घालण्यासाठी मोहीम

googlenewsNext
ठळक मुद्दे१७ ठिकाणचे नुमने घेतले : अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिवाळी दरम्यान मिठाई व इतर खाद्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. मात्र काही विक्रेते अतिरिक्त नफा कमविण्यासाठी मिठाई व इतर पदार्थांमध्ये भेसळ करतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग भंडारातर्फे शोध मोहीम राबवून १७ विक्रेत्यांकडून पदार्थांचे नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे.
देवरी येथील प्रदीप डेली निड्समधून मदर डेअरी लिव्ह लाईट डबल टोनड मिल्क व एबीज नॅच्युरल टोनेड मिल्क या अन्न पदार्थाचे नमुने घेण्यात आले. देवरी येथील आर. के. ट्रेडर्स मधून प्रसाद भोग, मटर, डाळ, बेसन व दिनशॉ तूप या अन्न पदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेत.
गोंदिया जिल्यातील धापेवाडा महालगाव हे खोवासाठी प्रसिद्ध आहे. महालगाव येथील आगाशे याच्यांकडून खोवा या अन्न पदार्थाचे नमुने घेण्यात आलेत. गोंदिया येथील गुरूनानक तेल भांडार, गौशाला वॉर्ड गोंदिया येथे सोयाबीन रिफार्इंडचे ९४ लिटर किंमत १२ हजार २२० रूपये जप्त करण्यात आले.
शुभम ट्रेडर्स रिंग रोड गोंदिया येथे पनीर, क्रीम, व्हे पावडर ,स्किम्ड मिल्क पावडर या अन्न पदार्थाचे नमुने घेण्यात आलेत. ४८ किलो स्किम्ड मिल्क पॉवडर (किंमत ८ हजार रु पये) व २७३ किलो व्हे पावडर (किंमत १९ हजार ११० रूपये ) जप्त करण्यात आले.
गोंदिया येथील सुनील आॅइल मिलमधून वनस्पती व रिफार्इंड सोयाबीन तेलाचे नमुने घेण्यात आले. आमगाव येथील बिकानेरमधून चांदी वर्क व बेसनचे नमुने घेण्यात आलेत. सुरेश ट्रेडर्स आमगाव येथून ब्रान्डेड व्हेजीटेबल तेलाचे व वनस्पती चे नमुने घेण्यात आलेत. या मोहिमेत एकूण १७ नमुने घेण्यात आले.
सदर नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल. सदर मोहीम सहआयुक्त शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त ना.रा.सरकटे यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी अखिलेश राऊत व पियूष मानवतकर यांनी राबविली.

Web Title: Campaign to stop adulteration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी