१६ जुलैचे परिपत्रक रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 09:21 PM2018-08-30T21:21:15+5:302018-08-30T21:23:32+5:30

१६ जुलैचे अंगणवाडी कर्मचारी विरोधी परिपत्रक रद्द करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) जिल्हा शाखेच्यावतीने गुरूवारी (दि.३०) जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या नावाने मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.

Cancel the 16 July circular | १६ जुलैचे परिपत्रक रद्द करा

१६ जुलैचे परिपत्रक रद्द करा

Next
ठळक मुद्देअंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी : जिल्हा परिषदेवर धडकला मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : १६ जुलैचे अंगणवाडी कर्मचारी विरोधी परिपत्रक रद्द करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) जिल्हा शाखेच्यावतीने गुरूवारी (दि.३०) जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या नावाने मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
राज्याच्या महिला-बाल विकास विभागाचे सहचिव ला.रा.गुजर यांच्या स्वाक्षरीने १६ जुलै रोजी २५ पेक्षा कमी मुले ज्या अंगणवाडीत आहेत अशा अंगणवाडीतील मुले जवळील अंगणवाडीत समाविष्ट करा असे परिपत्रक काढले. राज्यात ५५३ प्रकल्पांची फेररचना करून प्रकल्प संख्या कमी करणे म्हणजेच अधिकारी, कर्मचारी, सेविका ते मदतनीस पर्यंत सर्वांचीच कपात करणे हे या पत्रकातून स्पष्ट होते.
करिता अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनने या परिपत्रकाला निषेध करून १६ जुलै रोजीचे परिपत्रक रद्द करावे, अंगणवाडी सेविका-मदतनीस, मिनी अंगणवाडी यंचे भाऊबीजचे थकीत एक हजार रूपये देण्यात यावे व ज्या प्रकल्प अधिकाऱ्याने लापरवाही केली त्यावर कारवाई करावी, सेवा मुक्त अंगणवाडी सेविका-मदतनीस यांना सेवानिवृत्ती नंतर एकरकमी लाभ देण्याबाबत ३० एप्रिल २०१४ रोजी शासना निर्णयावर अमल न करणाऱ्या महिला बाल कल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प अधिकारी यांच्यावर कारवाई करून गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत ११२ कर्मचाऱ्यांना त्वरीत लाभ देण्यात यावा, आहार भत्ता व अमृत आहारचे प्रलंबित बिल काढण्यात यावे तसेच प्रलंबित प्रवास भत्ता देण्यात यावा व अनेक प्रकल्पांचे भत्ते कार्यालयीन चुकीमुळे देण्यात आले नाही करिता सन २०१३ ते २०१८ पर्यंतची चौकशी करण्यात यावी अशी मागणी अंगणवाडी-बालवाडी कर्मचाऱ्यांनी केली.
आपल्या मागण्यांसाठी अंगणवाडी-बालवाडी कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि.३०) जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
याप्रसंगी आयटकचे दिलीप उटाणे, हौसलाल रहांगडाले, शकुंतला फटींग, आम्रकला डोंगरे, जिवनकला वैद्य, विना गौतम, विजया डोंगरे, ब्रिजुला तिकडे, सुनिता मलगामे, दुर्गा संतापे, पौर्णिमा चुटे, जयकुवर मच्छीरके, वच्छला भोंगाडे, कांचन शहारे, अर्चना मेश्राम, अंजना ठाकरे, पुष्पलता भगत, प्रणिता रंगारी, विठा पवार, प्रतिभा दहीकर यांच्यासह मोठ्या संख्येत अंगणवाडी व बालवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.

Web Title: Cancel the 16 July circular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा