कंत्राटी बाजार वसुली रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 09:26 PM2018-05-03T21:26:15+5:302018-05-03T21:26:15+5:30

नगर परिषदेने बाजार वसुलीचे कंत्राट दिल्यानंतर आता कंत्राटदाराने बाजार वसुली सुरू केली आहे. या प्रकाराला नगर परिषदेतील कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा विरोध होता. त्यांनी हा प्रयोग रद्द करण्याची मागणी केली होती.

Cancel Contract Recovery | कंत्राटी बाजार वसुली रद्द करा

कंत्राटी बाजार वसुली रद्द करा

Next
ठळक मुद्देकॉँग्रेस मागणीवर ठाम : मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषदेने बाजार वसुलीचे कंत्राट दिल्यानंतर आता कंत्राटदाराने बाजार वसुली सुरू केली आहे. या प्रकाराला नगर परिषदेतील कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा विरोध होता. त्यांनी हा प्रयोग रद्द करण्याची मागणी केली होती. ते आपल्या मागणीवर ठाम असून गुरूवारी (दि.३) कॉँग्रेस सदस्य व सावित्रीबाई फुले चिल्लर भाजी विक्रेता संघाच्यावतीने मुख्याधिकारी चंदन पाटील यांना याबाबतचे निवेदन दिले.
नगराध्यक्षांच्या एका घोषणेमुळे नगर परिषदेच्या बाजार वसुलीवर गाज पडली. सुमारे ७ लाख रूपये वार्षीक उत्पन्न असलेली बाजार वसुली नगर परिषदेला बंद करावी लागली. मात्र बाजार वसुली बंद करताना तेवढ्याच रकमेच्या उत्पन्नाच्या दुसºया पर्यायाची व्यवस्था असावी असे नगर परिषद अधिनियमात नोंद आहे. त्यामुळे नगर परिषदेला बाजार वसुली कंत्राटी पद्धतीवर देण्याचे सुचले. त्यानुसार, नगर परिषदेने निविदा काढून इ-लिलाव केला. त्यात येथीलच एका कंत्राटदारास १६ लाख ५५ हजारांत बाजार वसुलीचे कंत्राट देण्यात आले. कंत्राटादाराने वसुली सुरू केली आहे.
कंत्राटी तत्वावर बाजार वसुलीच्या या प्रकाराला नगर परिषदेतील विरोधी पक्षातील कॉंग्रेस पक्षाचा सुरूवातीपासूनच विरोध होता. यावर त्यांनी जिल्हाधिकारी व आमदारांना निवेदन देऊन कंत्राटी बाजार वसुलीचा हा प्रकार रद्द करण्याची मागणीही केली होती. एवढेच नव्हे तर स्थायी समितीच्या सभेतही विरोध केला होता. मात्र संख्याबळाच्या आधारावर ते कमी पडले व नगर परषदेने कं त्राटी बाजार वसुली सुरू केली.
गुरूवारी (दि.३) मुख्याधिकारी पाटील यांच्या दालनात काँग्रेसच्या नगरसेवकांनी बैठक घेऊन चर्चा केली. या वेळी सावीत्रीबाई फुले चिल्लर भाजी विक्रेता संघाचे पदाधिकारीही उपस्थित होते.
शिष्टमंडळात नगर परिषदेतील कॉंग्रेस पक्षाचे गट नेता व बांधकाम समिती सभापती शकील मंसुरी, नगरसेवक सुनील भालेराव, सुनील तिवारी, क्रांती जायस्वाल, भागवत मेश्राम, पराग अग्रवाल, निर्मला मिश्रा, दिपीका रूसे, श्वेता पुरोहीत, सावीत्रीबाई फुले भाजी विक्रेता संघाचे अध्यक्ष कृष्णकुमार लिल्हारे, राजू नागरीकर, शिवसेना जिल्हा प्रमुख व भाजी विक्रेता संघाचे मुकेश शिवहरे उपस्थित होते.

बिना पावती वसुली व धमकावणी
कॉँग्रेस पक्षाच्या सदस्यांकडून देण्यात आलेल्या निवेदनात ज्या दिवसापासून कंत्राटदाराने बाजार वसुली सुरू केली आहे. त्या दिवसापासून कंत्राटदाराची माणस १० रूपयांऐवजी ३०-४० रूपये भाजी विक्रेत्यांकडून घेत असल्याचे नमूद आहे. एवढेच नव्हे तर भाजी विक्रेत्यांनी पैसे देण्यास नकार दिला असता त्यांना धमकावणी केली जात आहे. विना पावती कंत्राटदाराची माणसे वसुली करीत असल्याने त्वरीत कंत्राटी बाजार वसुली बंद करण्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर याविरोधात तिव्र आंदोलनाचा इशाराही या निवेदनातून दिला आहे.

Web Title: Cancel Contract Recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.