अंशदायी पेन्शन योजना रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 01:10 AM2019-01-09T01:10:50+5:302019-01-09T01:11:20+5:30
अंशदायी पेंशन योजना रद्द करा यासह अन्य मागण्यांसाठी येथील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने मंगळवारी (दि.८) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अंशदायी पेंशन योजना रद्द करा यासह अन्य मागण्यांसाठी येथील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने मंगळवारी (दि.८) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आले.
अंशदायी पेंशन योजना रद्द करा, सर्व प्रकारच्या अनियमीत कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, कंत्राटी कर्मचाºयांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घ्या, कामगार कायद्यातील कामगार कर्मचारी विरोधी व मालक धार्जीणे धोरण मागे घ्या, रिक्त व अनुकंपा तत्वावरील पदे भरा आदि मागण्यांसाठी देशातील प्रमुख ११ कामगार संघटना तसेच केंद्र व राज्य कर्मचारी महासंघाने संयुक्तरित्या ८ व ९ जानेवारीला देशव्यापी संप जाहिर केला. या संपाच्या समर्थनार्थ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने मंगळवारी (दि.८) दुपारी २.३० वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आले. या वेळी कर्मचाºयांनी सरकारच्या ठोकशाही धोरणाचा निषेध नोंदविला.कर्मचाºयांच्या मागण्यां मंजूर न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.