जगदलपूरवरून देवरीमार्गे आणला गांजा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:27 AM2021-05-17T04:27:18+5:302021-05-17T04:27:18+5:30
गोंदिया : कामठा येथील नामे घनश्याम ऊर्फ मोनू हरिचंद अग्रवाल (२५) याच्या घरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ७० ...
गोंदिया : कामठा येथील नामे घनश्याम ऊर्फ मोनू हरिचंद अग्रवाल (२५) याच्या घरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ७० किलो २५० ग्रॅम वजनाचा गांजा १३ मे रोजी रात्री ९.१० वाजता कामठा येथून पकडला. त्या आरोपीला न्यायालयाने १७ मेपर्यंत पाेलीस कोठडी सुनावली आहे. या पाेलीस कोठडीत त्याने तो गांजा जगदलपूर येथून सिमेंटच्या ट्रकमधून आणल्याची कबुली दिली आहे.
कामठा येथील आरोपी घनश्याम ऊर्फ मोनू हरिचंद अग्रवाल याने लॉकडाऊनच्या पूर्वी गांजा आणून ठेवला होता; परंतु लॉकडाऊनमुळे त्याचा गांजा विक्री होऊ शकला नाही. परिणामी, तो गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला. न्यायालयाने १७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी कसून चौकशी केली असता आरोपीने तो गांजा जगदलपूर येथून सिमेंटच्या बोरीच्या मधात टाकून देवरीपर्यंत आणला. देवरीवरून तो गांजा कामठा येथे आणल्याची माहिती त्याने दिली. या प्रकरणात त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. जप्त केलेलागांजा ७० किलो २५० ग्रॅम वजनाचा असून या गांजाची किंमत बाजारभावाप्रमाणे ८ लाख ४३ हजार रुपये आहे. आरोपी घनश्याम ऊर्फ मोनू हरिचंद अग्रवाल (२५) याच्या काका व काके भावावर रावणवाडी पोलिसांनी सन २०१२ मध्ये ३५ किलो गांजासह अटक केली होती.