सावधान, अल्पवयीनांना वाहन देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 06:00 AM2019-12-11T06:00:00+5:302019-12-11T06:00:13+5:30

शाळा-महाविद्यालय व ट्यूशनच्या वाढत्या बोजाखाली आजची पिढी दाबल्या जात आहे. सकाळी उठल्यापासून रात्री उशीरापर्यंत विद्यार्थ्यांचा ‘टाईम-टेबल फिक्स’ आहे. दिवसभरातील धावपळीत विद्यार्थी खचून जात असून त्यांना धावपळीत थोडी सोय म्हणून पालक वाहन हाती देत आहेत. ५०० -१००० रूपये भरून वाहन हाती येत असल्याने पालकही फायनन्सवर वाहन खरेदी करून आपल्या अल्पवयीन पाल्यांना देत आहेत.

Careful, do not drive vehicles to minors | सावधान, अल्पवयीनांना वाहन देऊ नका

सावधान, अल्पवयीनांना वाहन देऊ नका

Next
ठळक मुद्देवाहतूक नियंत्रण शाखेचे फर्मान : पालकांसाठी धोक्याची घंटा,पोलीस विभागाची मोहीम

कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बिनधास्तपणे वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अल्पवयीनांच्या हातून घडलेल्या अपघातांचे नुकसान त्यांना सहन करावे लागत नसले तरी अपघातग्रस्त व्यक्तीच नव्हे तर अपघात घडविणाºया अल्पवयीनांच्या पाल्यांना मात्र त्याचा जबर फटका सहन करावा लागतो. हे प्रकार टाळण्यासाठी आता वाहतूक नियंत्रण शाखेची अल्पवयीन वाहनचालकांवर करडी नजर आहे. सोबतच वाहतूक नियंत्रण शाखेने अल्पवयीनांना वाहन देणाºया पालकांनाही सावध होण्याचा इशारा दिला आहे.
शाळा-महाविद्यालय व ट्यूशनच्या वाढत्या बोजाखाली आजची पिढी दाबल्या जात आहे. सकाळी उठल्यापासून रात्री उशीरापर्यंत विद्यार्थ्यांचा ‘टाईम-टेबल फिक्स’ आहे. दिवसभरातील धावपळीत विद्यार्थी खचून जात असून त्यांना धावपळीत थोडी सोय म्हणून पालक वाहन हाती देत आहेत. ५०० -१००० रूपये भरून वाहन हाती येत असल्याने पालकही फायनन्सवर वाहन खरेदी करून आपल्या अल्पवयीन पाल्यांना देत आहेत. यामागील आपल्या पालकांचे प्रेम समजून घेता अल्पवयीन मुले-मुली अतिरेक करीत असून भरधाव वेगात वाहन चालवित फॅशन दाखवित आहेत. यात मात्र कित्येकदा अपघात घडत असून त्यांचे स्वत:चे तसेच समोरच्या व्यक्तीचे नुकसान करीत आहेत.
अपघातांचे वाढते प्रमाण व अल्पवयीनांकडून नियम तोडून सुरू असलेल्या वाहनांच्या या दुरूपयोगावर अंकुश बसविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक दिनेश तायडे यांनी अल्पवयीन वाहनचालकांविरोधात मोहिम छेडली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची अल्पवयीन वाहनचालकांवर करडी नजर असून त्यांच्या हाती लागल्यास अल्पवयीन वाहनचालक व त्यांच्या पालकांनाही याचा फटका सहन करावा लागणार आहे.
अल्पवयीन मुला-मुलींना वाहन हाती देणे गुन्हा असताना पालक त्याकडे दुर्लक्ष करीत अल्पवयीन मुला-मुलींना वाहन देऊन नियमभंग करीत आहेत. यामुळेच वाहतूक नियंत्रण शाखेने पालकांनाच आता अल्पवयीनांना वाहन देऊ नका अशा इशारा दिला आहे.

तीन महिने कारावास व दंडाची तरतूद
अल्पवयीन मुला-मुलींना वाहन देणे हा गुन्हा आहे. मात्र पालक याकडे दुर्लक्ष करीत असून १००-२०० रूपये दिल्यावर काहीच होत नाही असा गैरसमज बाळगून आहेत. मात्र नियमानुसार अल्पवयीनांना वाहन देणाऱ्यांस ३ महिने कारावास व दंडाची तरतूद आहे. वाहतूक पोलिसांच्या हाती लागणाऱ्या अल्पवयीन वाहन चालकांच्या पाल्यांना त्याचा फटका सहन करावा लागणार आहे. याकरिता वाहतूक नियंत्रण शाखेने मोहिम सुरू केली असून सूचना म्हणून नागरिकांना अल्पवयीनांना वाहन देऊ नका असा इशाराच दिला आहे.
८० अल्पवयींनाकडून ४६ हजारांचा दंड वसूल
वाहतूक नियंत्रण शाखेने अल्पवयीनांसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेंतर्गत आतापर्यंत ८० अल्पवयीन वाहनचालकांच्या पालकांकडून ४६ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. हे दंड वसूल केल्याची आकडेवारी असून या व्यतीरिक्त आणखीही केसेस करण्यात आल्या आहेत.आतापर्यंत वाहतूक नियंत्रण शाखेने पालक ांना पहिली चूक म्हणून फक्त दंड घेऊन सोडून दिले आहे. मात्र यापुढे नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.

आतापर्यंत चालकांना दंड आकारून सोडून दिले आहे. मात्र यापुढे अल्पवयीन वाहनचालक हाती आल्यास त्यांची केस थेट न्यायालयात पाठविली जाईल. त्यावर न्यायालय नियमानुसार जी कारवाई करेल त्याला संबंधितांना सामोरे जावे लागेल.
- दिनेश तायडे, निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया

Web Title: Careful, do not drive vehicles to minors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.