मान्सूनपूर्व तयारीचे सूक्ष्म नियोजन करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:31 AM2021-05-11T04:31:01+5:302021-05-11T04:31:01+5:30

गोंदिया : मान्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थितीला आटोक्यात आणण्याकरिता सर्व विभागांनी मान्सूनपूर्व तयारीचे सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश ...

Carefully plan your pre-monsoon preparations () | मान्सूनपूर्व तयारीचे सूक्ष्म नियोजन करा ()

मान्सूनपूर्व तयारीचे सूक्ष्म नियोजन करा ()

Next

गोंदिया : मान्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थितीला आटोक्यात आणण्याकरिता सर्व विभागांनी मान्सूनपूर्व तयारीचे सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी दिले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक सोमवारी (दि.१०) जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व नगर परिषद, नगरपंचायत मुख्याधिकारी व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सभेत विषयांचे सादरीकरण आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले.

जिल्हाधिकारी मीना म्हणाले, १ जूनपासून मान्सूनचा कालावधी सुरू होणार आहे. सर्वच विभागांनी नैसर्गिक आपत्तीचे पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ८७ गावांमध्ये पूरस्थितीचे संभाव्य धोके आहेत. त्यामुळे मान्सून कालावधीत या गावांमध्ये उपाययोजना करण्यासंबंधी सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. धान्यसाठा, औषधसाठा, आरोग्य पथक, पूर परिस्थितीची सूचना, जीवनावश्यक वस्तूंचा साठा उपलब्ध असल्यास नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यास सोईस्कर होईल. नगर परिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायत यांना त्यांच्या क्षेत्रात असलेल्या नाले, नालीसफाईचे काम करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य साथ आजार होण्याची शक्यता असते, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. पर्जन्यमानाची आकडेवारी सर्व तालुक्यात दररोज अद्ययावत करून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिल्या. जलसंपदा व महसूल विभाग यांनी योग्य समन्वय ठेवून काम करावे. जिल्ह्यातील रस्ते, जलाशये, जीर्ण इमारती, शाळा, महाविद्यालयाच्या इमारतीची मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने तपासणी करून वापरण्यास योग्य असल्यास तसा अहवाल सादर करावा. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे धरण, जलाशये, तलाव तसेच धोक्याच्या ठिकाणी कुणीही सेल्फी घेताना किंवा गर्दी करताना आढळल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य ती कार्यवाही करावी. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय स्थापित करण्यासाठी जिल्ह्यातील तालुका, नगर परिषद, नगरपंचायत, प्रभाग, वाॅर्ड आणि ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायत तसेच गावपातळीवर आपत्ती व्यवस्थापन समिती गठित करावी. जेणेकरून पूर परिस्थितीत ग्रामपातळीपर्यंत समन्वय साधला जाऊ शकेल, तसेच पूरस्थितीत जीवित व वित्तीयहानीचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

.......

धोक्याच्या ठिकाणी रेडियमचे फलक लावा

जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंता यांना धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी सर्व संबंधितांना सूचना देण्याबाबत, पोलीस विभागाला पाण्याखाली बुडालेले रस्ते, पूल या ठिकाणी बॅरिकेड लावून बंदोबस्त करण्याबाबत, पुरवठा विभागाला पूरप्रवण गावात धान्याचा साठा उपलब्ध करण्याबाबत, विद्युत विभागाला मान्सूनपूर्व विद्युततारांवरील झाडांच्या खांद्या कापणे, कार्यकारी

अभियंता बाघ इटियाडोह यांना धोक्याच्या ठिकाणांवर रेडीयमचे फलक लावण्याबाबत, आरोग्य विभागाला सर्व आरोग्य केंद्रात औषधांचा पर्याप्त साठा उपलब्ध ठेवण्याबाबतचे निर्देश मीना यांनी दिले.

Web Title: Carefully plan your pre-monsoon preparations ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.