कोरोना आटोक्यात, डेल्टाच्या अनुषंगाने खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:34 AM2021-07-14T04:34:14+5:302021-07-14T04:34:14+5:30

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सोमवारी (दि. ११) १४० चाचण्या करण्यात आल्या. यात ६२ आरटीपीसीआर, तर ७८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट ...

Carona atoka, delta cautionary tale | कोरोना आटोक्यात, डेल्टाच्या अनुषंगाने खबरदारी

कोरोना आटोक्यात, डेल्टाच्या अनुषंगाने खबरदारी

Next

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सोमवारी (दि. ११) १४० चाचण्या करण्यात आल्या. यात ६२ आरटीपीसीआर, तर ७८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १ नमुना कोरोनाबाधित आढळला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.७४ टक्के आहे. सोमवारी जिल्ह्यात २ बाधितांनी मात केली, तर एका रुग्णाची नोंद झाली. मागील दीड महिन्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून, बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णाची संख्या २० वर आली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत २,०५,९८६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १,८०,८९५ नमुने निगेटिव्ह आले. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत २,१९,९३१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १,९८,८४९ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४१,१६७ कोरोना बाधित आढळले असून, ४०४४६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत २० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

...........

कोरोना रिकव्हरी रेट ९८.२५

कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने कमी होत असून, मात करणाऱ्यांची संख्या दुप्पट आहे. त्यामुळे कोरोनाचा रिकव्हरी रेट ९८.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Web Title: Carona atoka, delta cautionary tale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.