कोरोना आटोक्यात पण डेल्टामुळे खबरदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:21 AM2021-07-01T04:21:23+5:302021-07-01T04:21:23+5:30
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी (दि. ३०) २७३४ स्वॅब नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात १३१७ स्वॅब नमुन्यांची आरटीपीसीआर ...
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी (दि. ३०) २७३४ स्वॅब नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात १३१७ स्वॅब नमुन्यांची आरटीपीसीआर तर १४१७ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात आठ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.३० टक्के आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असून डेल्टा प्लसच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे खबरदारी घेतली जात आहे.
जून महिन्यात कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला आहे. बुधवारी जिल्ह्यात ११ बाधितांनी कोरोनावर मात केली तर ८ नवीन रुग्णांची भर पडली. कोराेना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,९५,१०२ स्वॅब नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १,६९,७८७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनोबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत २,१७,४६२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १,९६,५०३ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४१,१३० कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी ४०,३९२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ३८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून २४५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा रिकव्हरी रेट ९८.२० टक्के आहे.