भरधाव कंटेनरची ट्रकला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:04 AM2018-07-05T00:04:57+5:302018-07-05T00:05:49+5:30

भरधाव कंटेनरने ट्रकला धडक दिल्याने दोन चालकांसह क्लीनर असे तिघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि.१) रात्री ११.३० ते ११.४५ वाजताच्या दरम्यान नवेगावबांध-कोहमारा मार्गावरील येथील नाक्याजवळ घडली.

Carrying the Container's Truck | भरधाव कंटेनरची ट्रकला धडक

भरधाव कंटेनरची ट्रकला धडक

googlenewsNext
ठळक मुद्देअपघात : दोन चालकांसह क्लीनर गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : भरधाव कंटेनरने ट्रकला धडक दिल्याने दोन चालकांसह क्लीनर असे तिघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि.१) रात्री ११.३० ते ११.४५ वाजताच्या दरम्यान नवेगावबांध-कोहमारा मार्गावरील येथील नाक्याजवळ घडली.
रविवारी रात्री अर्जुनी-मोरगावकडून कोहमाऱ्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने एच. आर. ३८/यु-५२४१ कोहमाऱ्याकडून अर्जुनी-मोरगावच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला सी.जी.०४/जे.सी.-८१९६ समोरासमोर येथील कोहमारा मार्गावर नाक्याजवळ धडक दिली. यात कंटेनर चालक चंदन अरुण सिंग (२१) रा. सदपूर (बिहार) याच्या डाव्या पायाचा पंजाच तुटला. तर ट्रक चालक जागेश्वर पतिराम परतेकी (३५) रा. रेंगेपार दल्ली यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले व जबर दुखापत झाली. तसेच ट्रकचा क्लिनर गुरुदेव वासुदेव तुमडाम (२२) रा. बोळदे-करड याच्या डोक्याला मार लागल्याने जखमी झाला.
फिर्यादी गुरुदेव वासुदेव तुमडाम यांनी नवेगावबांध पोलीस ठाण्यात अपघाताची तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींना नवेगावबांधच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉ.योगेंद्र यादव, डॉ.सचिन लंजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींवर ताबडतोब उपचार केला. जागेश्वर परतेकी व चंदन अरुण सिंग यांची गंभीर प्रकृती लक्षात घेऊन त्यांना सामान्य रुग्णालय भंडारा येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.
कंटेनर चालक चंदन अरुण सिंग याच्यावर निष्काळजीपणा व हयगयीने वाहन चालविण्याचा ठपका ठेऊन भादंविच्या २७९, ३३७, ३३८ व मोवाका १८४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: Carrying the Container's Truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात