विनाकारण फिरणाऱ्या आणखी ३० जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:47 AM2021-05-05T04:47:54+5:302021-05-05T04:47:54+5:30
गोंदिया : विनाकारण घराबाहेर पडून शहरातील रस्त्यारस्त्यावर व चौकाचौकात भ्रमंती करणाऱ्या ३० तरुणांवर गोंदिया व रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल ...
गोंदिया : विनाकारण घराबाहेर पडून शहरातील रस्त्यारस्त्यावर व चौकाचौकात भ्रमंती करणाऱ्या ३० तरुणांवर गोंदिया व रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चार गुन्ह्यात ३० जणांवर कारवाई करण्यात आली.
गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जयस्तंभ चौकात ३ मे रोजी रात्री ८ वाजता १० आरोपी विनाकारण फिरत असताना त्यांच्यावर पोलीस शिपाई सुमित जांगळे यांनी कारवाई केली आहे. गोंदिया शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २६६/२०२१ भादंविच्या कलम १८८ २६९ सहकलम ५१ ब राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ सहकलम २,३ साथीचे रोग प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दुसरी कारवाई ३ मे रोजी दुपारी १ वाजताची आहे. शहराच्या मनोहर चौक गोंदिया येथे विनाकारण फिरणाऱ्या १० जणांवर गोंदिया शहर पोलिसात अपराध क्रमांक २६७/२०२१ भादंविचे कलम १८८ २६९, सहकलम ५१ ब राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ सहकलम २,३ साथीचे रोग प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तिसरी कारवाई रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कटंगीनाका येथील आहे. ३ मे रोजी सकाळी १०.३० वाजता ५ आरोपी विनाकारण फिरत होते. चवथी कारवाई रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुडवानाका येथे ३ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता पाच आरोपी विनाकारण फिरत असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोनाची साथ सुरू असतांनाही आरोपी विनाकारण घराबाहेर फिरत होते. ही कारवाई पोलीस हवालदार नामदेव बनकर यांनी केली आहे. आरोपीवर रामनगर पोलिसांनी अपराध क्रमांक १३०/२०२१ कलम १८८, २६९ भादंवि सहकलम ५१ ब आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, सहकलम ११ महाराष्ट्र कोविड अधिनियम २०२० अन्वये गुन्हा नोंद केला आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू असतानाही विनाकारण आरोपी घराबहेर निघून फिरत होते.