गोरेगावच्या नायरा हॉस्पिटल चालकावर गुन्हा दाखल ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:28 AM2021-05-14T04:28:32+5:302021-05-14T04:28:32+5:30

गोंदिया : गोरेगाव येथील नायरा हॉस्पिटल मार्फत कोरोना बाधितांवर अनधिकृतपणे उपचार केल्याप्रकरणी या हॉस्पिटलच्या चालकावर बुधवारी गुन्हा दाखल ...

Case filed against Naira Hospital driver in Goregaon () | गोरेगावच्या नायरा हॉस्पिटल चालकावर गुन्हा दाखल ()

गोरेगावच्या नायरा हॉस्पिटल चालकावर गुन्हा दाखल ()

googlenewsNext

गोंदिया : गोरेगाव येथील नायरा हॉस्पिटल मार्फत कोरोना बाधितांवर अनधिकृतपणे उपचार केल्याप्रकरणी या हॉस्पिटलच्या चालकावर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना रूग्णांवर उपचार करण्याची परवानगी नसताना नायरा हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार केला जात होता. याची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली नव्हती. कोरोना रूग्णांना सेवा देण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य उघड्यावर टाकण्यात आले. या प्रकरणाची तक्रार स्थानिक प्रशासनाला केल्याने उपविभागीय अधिकारी, गोरेगावचे ठाणेदार, तहसीलदार यांनी १९ एप्रिल रोजी त्या हॉस्पिटलचा दौरा केला असता त्या हॉस्पिटलमध्ये १४ कोरोना रूग्ण उपचार घेत असल्याचे लक्षात आले. याची माहिती डॉ. लक्ष्मीकांत वाघमारे यांनी स्थानिक प्रशासनास न देता रूग्णांचा जीव धोक्यात घालून उपचार केले. या हॉस्पिटलमधील जैविक कचऱ्याची विल्हेवाट देखील विहीत पद्धतीने न लावता हॉस्पिटलच्या परिसरात इतरत्र फेकण्यात आल्याने स्थानिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. या हॉस्पिटलवर प्रशासनाने दंड आकारला होता, परंतु डॉ. लक्ष्मीकांत वाघमारे यांनी तो दंड ही भरला नाही. त्यामुळे गोरेगावच्या नगरपंचायतमधील प्रशासकीय अधिकारी आशुतोष रंगराव कांबळे यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी भादंविच्या कलम १८८,२६९,२७० सहकलम ५१ (ब) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ सहकलम २,३,४ साथीचे रोग अधिनियम १८९७ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव करीत आहेत.

Web Title: Case filed against Naira Hospital driver in Goregaon ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.