क्षयरुग्णांची माहिती न देणाऱ्या खासगी रुग्णालयावर गुन्हा दाखल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:30 AM2021-02-24T04:30:53+5:302021-02-24T04:30:53+5:30

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकाच्या अधिसूचनेनुसार प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद होऊन त्याला उपचार करणे व क्षयरोगाचा प्रसार रोखणे, ...

A case will be filed against a private hospital for not providing information on tuberculosis patients | क्षयरुग्णांची माहिती न देणाऱ्या खासगी रुग्णालयावर गुन्हा दाखल होणार

क्षयरुग्णांची माहिती न देणाऱ्या खासगी रुग्णालयावर गुन्हा दाखल होणार

Next

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकाच्या अधिसूचनेनुसार प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद होऊन त्याला उपचार करणे व क्षयरोगाचा प्रसार रोखणे, नियमित उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या, क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना म्हणून अशा रुग्णांची नोंदणी करणे आवश्यक आहे. खासगी क्षेत्रातील वैद्यकीय संस्थांनी क्षयरोग निदान करणाऱ्या राज्यातील सर्व पॅथॉलॉजी मायको बायोलॉजी, प्रयोगशाळा रिव्हर्स रेडिओलॉजी, सुविधा क्षयरुग्णावर उपचार करणारे विविध पॅथॉलॉजी, रुग्णालये, डॉक्टर्स, क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेते यांना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करावी लागणार आहे. जी संस्था नोंदणी करणार नाही, अशा संस्था, व्यक्तींना क्षयरोगाचा प्रसार करण्यास जबाबदार धरण्यात येणार आहे. दोषी ठरलेल्या व्यक्तीस सहा-सहा महिने ते दोन वर्षापर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद आहे. त्यामुळे रुग्णालये, औषध विक्रेते, पॅथॉलॉजिस्ट यांनी रुग्णांची माहिती कळवावी, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.रा.ज. पराडकर यांनी कळविले आहे.

Web Title: A case will be filed against a private hospital for not providing information on tuberculosis patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.