जि.प.च्या १३२ शाळांवर सीसीटीव्हीचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 09:41 PM2019-07-03T21:41:38+5:302019-07-03T21:42:03+5:30
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी,विद्यार्थिनी सुरक्षीत राहावे यासाठी ते विद्यार्थी सीसीटीव्हीच्या निगराणीत ठेवणे आवश्यक आहे. हल्ली विद्यार्थिनींचे लैंगीक शोषण होत असल्याच्या तक्रारी मागील वर्षी मोठ्या प्रमाणात आल्या. हे होऊ नये यासाठी प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे. यादृष्टीने गोंदिया जिल्ह्यातील १३२ शाळांमध्ये हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी,विद्यार्थिनी सुरक्षीत राहावे यासाठी ते विद्यार्थी सीसीटीव्हीच्या निगराणीत ठेवणे आवश्यक आहे. हल्ली विद्यार्थिनींचे लैंगीक शोषण होत असल्याच्या तक्रारी मागील वर्षी मोठ्या प्रमाणात आल्या. हे होऊ नये यासाठी प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे. यादृष्टीने गोंदिया जिल्ह्यातील १३२ शाळांमध्ये हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
महाराष्टÑ शासनाने मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमांतर्गत प्रगत शाळा, डिजीटल शाळा, ज्ञानरचनावाद, कृतीयुक्त शिक्षण दिले. शाळांमध्ये आयएसओ होण्यासाठी स्पर्धा वाढत आहे. १०० टक्के विद्यार्थ्यांचे मराठी वाचन क्षमता विकसीत करणे, गणित संबोध विकसीत करणे, इंग्रजी वाचन क्षमता, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे स्पोकन इंग्लीश, विद्यार्थी व शिक्षकांचे विज्ञान संबोध विकसीत करणे, शाळेतील सर्व विषयात तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर करणे, विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून देणे,अध्ययन अध्यापनात कृतीयुक्त पध्दतीने सामानिकरण रूजविणे, सामाजिक शास्त्राची स्पर्धा परीक्षेशी सांगड घालणे, शाळेत लोकसहभागातून भौतिक सुविधा मिळविणे, ज्ञानरचनावाद व आनंददायी पध्दतीने शिकविण्यास शैक्षणिक वातावरण निर्मिती करणे, विषय साधन व्यक्ती व विषयतज्ज्ञ विद्यार्थ्यांचा स्तर निश्चीत करतील, विद्यार्थ्यांना कृतीयुक्त मार्गदर्शन व शिक्षकांना प्रात्याक्षीक देणे, शिक्षकांच्या अडचणी शोधून त्या दूर करणे, शिक्षकांना कार्यप्रवण करणे, भाषा, गणित व इंग्रजी विषयाचे शंभर टक्के कौशल्य मिळविणे, समाज सहभागासाठी व्यवस्थापन समितीची सभा, ग्रामपंचायत भेटी व ग्रामस्थांच्या भेटी घेणे, शाळांची प्रतवारी उंचावणे, शाळा प्रगतीचे अहवाल सादर करणे व शिक्षक परिषदांचे आयोजन करून चांगले कार्य करणाऱ्या शिक्षकांना व्यासपीठ देण्याचेही काम केले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा कल जि.प. शाळांकडे वाढत आहे. सोबतच खासगी शाळांप्रमाणे गुणवत्तायुक्त इंग्रजीचे शिक्षण देण्यासाठी ३८ शाळांमध्ये मागच्या वर्षी कॉन्व्हेंट सुरू करण्यात आले. हे सर्व करीत असतांना विद्यार्थ्यांचे लैंगीक व मानसिक शोषण होऊ नये यासाठी प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. या दृष्टीने गोंदिया जिल्ह्यातील १३२ शाळांनी पाऊले उचलली आहे.लोकसहभागातून शाळा सीसीटीव्ही कॅमेºयात येत आहेत.
गोंदिया तालुक्यातील ७२ शाळांत सीसीटीव्ही
गोंदिया जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील १ हजार ६६१ शाळांचे सर्वेक्षण केले.यात १३२ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २१२ पैकी १५ शाळांत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तर १९७ शाळांमध्ये ही सोय नाही. आमगाव १५४ पैकी ७ तर १४७ शाळांमध्ये ही सोय नाही. देवरी २०८ पैकी ८ शाळांत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तर २०० शाळांमध्ये ही सोय नाही.गोंदिया ४१३ पैकी ७२ शाळांत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तर ३४१ शाळांमध्ये ही सोय नाही. गोरेगाव १५८ पैकी ४ शाळांत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तर १५४ शाळांमध्ये ही सोय नाही. सालेकसा १४३ पैकी १० शाळांत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तर १३३ शाळांमध्ये ही सोय नाही. सडक-अर्जुनी १७१ पैकी ८ शाळांत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तर १६३ शाळांमध्ये ही सोय नाही. तिरोडा २०२ पैकी ८ शाळांत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तर १९४ शाळांमध्ये ही सोय नाही.
खासगी शाळेतील ६९७ विद्यार्थी परतले
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा बोलक्या करण्यावर भर देण्यात आला. मागील दोन वर्षात खासगी शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या ६९७ झाली आहे. गोरेगाव तालुक्यात १२०, सालेकसा ९४, अर्जुनी-मोरगाव ३१, सडक-अर्जुनी ३५, गोंदिया १७०, तिरोडा १२३, देवरी ४८ व आमगाव ७६ विद्यार्थ्यांनी खासगी शाळेतून जिल्हा परिषद शाळेत नाव दाखल केले.