४० प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सीसीटीव्हीचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 09:38 PM2018-04-26T21:38:19+5:302018-04-26T21:38:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सरकारी आरोग्य केंद्रात वाढत्या गुन्हेगारीच्या प्रकरणावर करडी नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात ३२० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे राज्यात हा पहिलाच प्रयोग आहे.
राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. या निर्णयाने आरोग्य कर्मचाºयांच्या सुरक्षेसह गुन्हेगारीवर काही प्रमाणात अंकुश लागणार आहे. गत काही वर्षात सरकारी आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाºयांसोबत मारहाण व अन्य गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनावर अंकुश लावण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाद्वारे जिल्ह्यातील संपूर्ण ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. बहुतांश ुठकाणी कॅमेरे लावले तर काही ठिकाणी लावण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांनी लिी आहे.
गोंदिया तालुक्यातील भानपूर, एकोडी, दासगाव, दवनीवाडा, मोरवाही व खमारी, तिरोडा तालुक्यातील इंदोरा, वडेगाव, मुंडीकोटा, सुकडी डाक, गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा, चोपा, सोनी, कुºहाडी, तिल्ली मोहगाव, आमगाव तालुक्यातील बनगाव, ठाणा, कालीमाटी, तिगाव, सालेकसा तालुक्यातील सातगाव, कावराबांध, दर्रेकसा, बिजेपार, देवरी तालुक्यातील मुल्ला, फुटाना, ककोडी, घोनाडी, सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा, शेंडा, खोडशिवनी, पांढरी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील कोरंभीटोला, महागाव, गोठणगाव, चान्ना/बाक्टी, केशोरी, धाबेटेकडी, या सर्व ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ असे एकूण ८-८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहे.
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य विभाग व संबंधित कंपनीद्वारे निरीक्षण करण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याने गुन्हेगारीवर आळा बसेल. यामुळे तेथील कार्यरत कर्मचाºयांची सुरक्षा होणार आहे.
हजेरीसाठी बायोमेट्रिक मशीन
प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत अनेक कर्मचारी व अधिकारी मुख्यालयात न राहता दुरुन अप-डाऊन करतात. वेळेवर ते हजर नसल्याने रुग्णांचे प्राण देखील जाऊ शकते. कर्मचाºयांच्या अनुपस्थितीतवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रशासनाद्वारे बामोमेट्रिक मशीन लावण्ययात आली आहे. यामुळे सर्वांना वेळेवर हजर राहणे अनिवार्य आहे. तसेच वेळेपूर्वीच कर्मचारी घरी जाऊ शकणार नाही.