सण व उत्सव शांततेत साजरे करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:33 AM2021-09-06T04:33:46+5:302021-09-06T04:33:46+5:30
एकोडी : आपण साजरे करीत असलेले सण व उत्सव एकात्मता व आपल्यातील प्रेमाचे प्रतीक असतात. त्यामुळे गावात सण व ...
एकोडी : आपण साजरे करीत असलेले सण व उत्सव एकात्मता व आपल्यातील प्रेमाचे प्रतीक असतात. त्यामुळे गावात सण व उत्सव शांततेत साजरे करावेत, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांनी केले.
येथील ग्रामपंचायत कार्यलयात येत्या पोळा व गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.५) गावात सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागाकडून घेण्यात आलेल्या दक्षता व शांतता समितीच्या अतिआवश्यक सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच शालू चौधरी होत्या. याप्रसंगी गंगाझरीचे ठाणेदार पोपट टिळेकर, पोलीस पाटील दिलीप रिनायत, तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवशंकर हरिणखेडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयप्रकाश बिसेन, रविकुमार पटले, उपसरपंच वर्षा अंबुले, किरण मेश्राम, अजाब रिनायत, राकेश बिसेन, दीपक रिनायत, वहिदा शेख, रंजू पटले, खालिक पठाण, पंकज मेश्राम यांच्यासह गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.