विवाह सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:40 AM2018-11-15T00:40:32+5:302018-11-15T00:41:22+5:30

ख्वाजा गरीब नवाज अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्थेने सामुहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून समाज कार्याचे एक पाऊल पुढे टाकले आहे. युवकांनी देखील यात सक्रीयपणे सहभाग घेऊन कार्य केले ही बाब खरोखरच प्रशंसनीय आहे.

Celebrate the marriage ceremony every year | विवाह सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करणार

विवाह सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करणार

googlenewsNext
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : विविध मान्यवरांची उपस्थिती, जिल्हा व जिल्ह्याबाहेरील मुस्लीम समाजबांधवांनी लावली हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ख्वाजा गरीब नवाज अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्थेने सामुहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून समाज कार्याचे एक पाऊल पुढे टाकले आहे. युवकांनी देखील यात सक्रीयपणे सहभाग घेऊन कार्य केले ही बाब खरोखरच प्रशंसनीय आहे. मागील काही वर्षांपासून मुस्लीम समाज सामूहिक विवाह सोहळा आणि शादीखान्याच्या नावावर मुस्लीम समाजावर काहीजण टिका करीत आहे. मात्र संस्थेने याकडे लक्ष न देता या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करुन समाजाच्या पलिकडे जावून कार्य केले. त्यामुळे मुस्लीम समाजाच्या सामुहिक विवाह सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करण्याची ग्वाही आ.गोपालदास अग्रवाल यांनी दिली.
या ख्वाजा गरीब नवाज अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्थानिक सर्कस मैदानावर मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी समाजबांधवाना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या वेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते डॉ.राधाकृष्ण विखे पाटील,मनोहरभाई पटेल अकेडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल, हाजी अमीन गोडील, अमीन कंडुरेवाला, असलमभाई गोडील, हाजी हनीफभाई, रफीक कुरैशी, जुनैदभाई, हाजी कुतुबुद्दीन सोलंकी, हाजी जब्बार भाई, खालीद पठान, शकील मन्सुरी, अशफाकभाई, साबीर पठान, सुल्ताना तिगाला, जहीर अहमद, महफुजभाई, हाजी अशफाक अहमद, सगीर अहमद, यासीन तिगाला, हाजी अबरार सिद्दीकी, हाजी जलील सोलंकी, हाजी गुलाम, कदीर खान, रिजवान वैद्य, अख्तर अल्ली, सरफराज अमीन गोडील, रियाज रज्जाक कच्छी, फिरोज पोठीयावाला, ईलीयास फांडन, ओवेश पोठीयावाला, फिरोज कच्छी, गुलाम हसन लोहीया, रेहान फारुन कंडरेवाला, इमरान असलम गोडील,असलमभाई मिस्त्री, ईरशाद कंडुरेवाला, जावेद रजा उपस्थित होते.
अग्रवाल म्हणाले, कितीही अडचणी आल्या तरी गोंविदपूर येथे शादीखाना तयार करण्यात येणार आहे. यासाठी काँग्रेस सरकारच्या काळात ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यापैकी पहिल्या टप्प्यातील तीन कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाला आहे. विविध अडचणी आणून शादीखान्याच्या बांधकामान खोडा निर्माण करण्यात आला होता. मात्र लवकरच शादीखान्याचे बांधकाम पूर्ण केले जाईल,अशी ग्वाही अग्रवाल यांनी दिली.
वर्षा पटेल यांनी खा.प्रफुल्ल पटेल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र काही महत्त्वाच्या कामामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी या विवाह सोहळ्याला शुभेच्छा दिल्या असून मुस्लीम समाजबांधवांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. माजी मंत्री नबाब सिद्दीकी यांनी सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या सर्व नवयुगलांना शुभेच्छा दिल्या. मुस्लीम समाजबांधवानी सामुहीक विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सामुहिक विवाह सोहळ्यामुळे खर्चाची बचत होते शिवाय समाजात एकोपा निर्माण करण्यास मदत होते. मी माझ्या मुलाचा विवाह सामुहिक विवाह सोहळ्यात केल्याचे सांगितले. विकास आणि रोजगाराचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने एकाही आश्वासनाची पूर्तता केली. केवळ दिशाभूल करण्याचे काम केले. समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सत्तारुढ सरकार करीत असून अशा सरकारपासून सावध राहण्याचे आवाहन केले.
प्रास्तविकातून संस्थेचे अध्यक्ष सरफराज गोडील यांनी समाजातील युवकांनी लोक हिताचे कार्य करण्यासाठी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले.आ.अग्रवाल यांच्या सहकार्यामुळे हे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात मदत होत असल्याचे सांगितले. गोंदिया शहरात कधीच जातीय तेढ निर्माण झाला नाही, सर्वजण गुण्यागोविंदाने राहत असल्याचे सांगितले. मुस्लीम समाजाला शादीखाना बांधकामासाठी शासकीय दराने जागा उपलपब्ध करुन देण्याची मागणी केली.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा काँग्रेस महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले. यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.
२० जोडपी विवाहबद्ध
या ख्वाजा गरीब नवाज अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्थानिक सर्कस मैदानावर आयोजित मुस्लीम समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण २० जोडपी विवाहबद्ध झाली. या वेळी शहरातील मुस्लीम समाजबांधव व इतर मान्यवरांनी मोठ्या संख्येनी उपस्थित लावून नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले.
सर्कस मैदानाला यात्रेचे स्वरुप
शहरातील सर्कस मैदानावर आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यानिमित्त जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील मुस्लीम समाजबांधव मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. त्यामुळे सर्कस मैदान परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते.
मनोरंजनासाठी कव्वालीचे आयोजन
सर्कस मैदानावर आयोजित सामूहिक विवाह सोहळ्या दरम्यान दिल्ली येथील प्रसिध्द कव्वाल फैजान निजामी यांच्या कव्वालीचे आयोजन करण्यात आले होते. याचा मुस्लीम समाजबांधवानी उपस्थित राहून आंनद घेतला.

Web Title: Celebrate the marriage ceremony every year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.