राणी दुर्गावतींचा बलिदान दिवस साजरा
By admin | Published: June 26, 2017 12:26 AM2017-06-26T00:26:55+5:302017-06-26T00:26:55+5:30
आदिवासी समाजाच्यावतीने गोंडीटोला कटंगी येथे शनिवारी (दि.२४) गोंडवाना वीरांगणा महाराणी दुर्गावती यांचा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आदिवासी समाजाच्यावतीने गोंडीटोला कटंगी येथे शनिवारी (दि.२४) गोंडवाना वीरांगणा महाराणी दुर्गावती यांचा बलिदान दिवस शहिद स्मृती दिन म्हणून साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी आदिवासी नेते गुलाबसिंह कोडापे होते. प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी गोवारी नेते गोकुळ बोपचे, दिनेश कोहळे, तुळशिराम कोडापे, सामाजिक कार्यकर्ते ब्रिजलाल मडकाम, अशोक पाटील, कृष्णाजी फुन्ने, योगराज कोहळे, माजी उपसरपंच मंदा मेश्राम आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपालसिंह उईके यांच्या हस्ते गोंडवाना साम्राज्याचा ध्वजाचे अनावरण करुन करण्यात आली. दरम्यान गोंडी ध्वजगीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितांनी राणी दुर्गावतीच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले. यावेळी गोंदिया शहरातील नवीन उड्डाणपुलाला न.प.चे माजी विद्यार्थी व कटंगीटलाचे मुळ निवासी लोकनेते माजी आ. नारायणसिंह उईके यांचे नाव देण्यात यावे आणि गोंडीटोला कटंगी येथील चौकाला खिला मुठ्या चौक गोंडीटोला असे नाव देण्यात यावे, असे दोन ठराव पारीत करण्यात आले. प्रास्ताविक कमल कोडापे यांनी मांडले. संचालन दामोदर नेवारे यांनी केले. आभार सामाजिक कार्यकर्ते पेंटर मडकाम यांनी मानले. कार्यक्रमासाठी ठाणीराम धुर्वे, ग्रा.पं.सदस्य संगीता कोडापे, पुरणलाल चौधरी, लक्ष्मणसिंह उईके, शामलाल राऊत, लखनलाल वघारे आदींनी सहकार्य केले.
शेंडा-कोयलारी : येथील राणी दुर्गावती चौकात उपसरपंच छत्रपाल परतेकी यांच्या हस्ते प्रतिमेची पूजा करुन प्रतिष्ठीत नागरिक धनलाल मानवटकर यांचे हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कमल वैद्य होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पवन टेकाम, योगेश टेंभरे, प्रल्हाद बोरकर, प्रशांत बोरकर, शैलेश उईके, अशोक परतेकी, प्रल्हाद खोब्रागडे, धनलाल मानवटकर, वामन लांजेवार, हरीष वाढीवे, लच्छु कुरसुंगे, यादोराव कुरसुंगे, रजनी वाढीवे उपस्थित होते. यावेळी वक्त्यांनी राणी दुर्गावतीच्या जीवनावर प्रकाश टाकून मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी राणी दुर्गावती स्मारक समितीचे पदाधिकारी व समाज बांधवमोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक रजनी वाढीवे यांनी मांडले. संचालन यशवंत सलामे यांनी केले. आभार हरीष वाढीवे यांनी मानले.