धार्मिक सण आणि उत्सव शांततेत पार पाडा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:33 AM2021-09-05T04:33:02+5:302021-09-05T04:33:02+5:30
केशोरी : स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत समावेश असलेल्या गावामध्ये आगामी होऊ घातलेला पोळा सण व गणेश उत्सव नागरिकांनी व ...
केशोरी : स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत समावेश असलेल्या गावामध्ये आगामी होऊ घातलेला पोळा सण व गणेश उत्सव नागरिकांनी व गणेश मंडळांनी शांततेत पार पाडण्याचे आवाहन येथील ठाणेदार संदीप इंगळे यांनी पोलीस स्टेशन येथील वाचनालयाच्या इमारतीमध्ये पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीतून केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी कोरोना विषाणूची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधिन राहून केलेल्या मार्गदर्शन सूचनेनुसार पोळा सण आणि गणेश उत्सव त्याचबरोबर इतर धार्मिक सण साजरे करण्यासंदर्भात केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील आणि गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांसह शांतता समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी बांधकाम सभापती प्रकाश पाटील गहाणे होते. केशोरीचे सरपंच नंदू पाटील गहाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल, रामलाल मुंगलवार, हरिराम पेशने, चरण चेटुले, उद्योगपती सचिन फटिंग उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम रक्तदान शिबिरे, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण इत्यादी कार्यक्रम आयोजित करुन कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजारावर प्रतिबंधात्मक उपाय गावा-गावात कसे राबविता येईल याचे नियोजन गणेश मंडळाने करुन पोलीस विभागाला शांतता व सुव्यवस्था टिकविण्यासाठी सहकार्य करावे असे मार्गदर्शन केले. यावेळी बीट जमादारासह पोलीस पाटील आणि गणेश मंडळाने पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.