जागतिक पर्यावरण दिवस साजरा
By admin | Published: June 11, 2017 01:12 AM2017-06-11T01:12:55+5:302017-06-11T01:12:55+5:30
मध्य भारत एज्युकेशन सोसायटी व तिरोडा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.५) तिरोडा नगर परिषद
तिरोडा नगर परिषदेचा पुढाकार : पर्यावरण संतुलनावर मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मध्य भारत एज्युकेशन सोसायटी व तिरोडा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.५) तिरोडा नगर परिषद कार्यालयात जागतिक पर्यावरण दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उद्घाटन मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सोनाली देशपांडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अशोक अरोरा, श्वेता मानकर, राखी गुणेरिया, रश्मी बुराडे, भावना चवडे, अध्यक्ष मध्य भारत एज्युकेशन सोसायटी सम्राट पाल, सचिव लायन्स क्लब गेडाम, डॉ. जुगल किशोर लढ्ढा उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्याधिकारी देशमुख यांनी, विकासाच्या मार्गावर चालताना आपण निसर्गापासून खूप दूर गेलो आहोत. आपली किती तरी संपत्ती नष्ट झाली असल्याचे मत व्यक्त केले. नगराध्यक्ष देशपांडे यांनी, ५ जून जागतिक पर्यावरण दिन, आमच्या त्याच चुका समजून आणि जगभरात त्यांचे दुष्परिणाम होणार नाही हे समजून घेणे या उद्देशाने साजरा केला जातो.
प्रथमच जागतिक तापमान वाढ, अन्न टंचाई, जंगलतोड इ. संयुक्त राष्ट्राने पर्यावरण कार्यक्रम करुन युनायटेड नेशन्स द्वारा जागतिक पर्यावरण दिवस मानला जातो. वैज्ञानिकाप्रमाणे पुढच्या भविष्यामध्ये मानव प्रेरीत पर्यावरणात बदल झाल्यामुळे दोन तृतियांश पेक्षा जास्त वनस्पती व जीव जंतू नष्ट होतील, असे सांगितले.
प्रास्ताविक सम्राट पाल यांनी मांंडले. संचालन विनायक डोंगरवार यांनी केले. आभार अजय खसकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी महेश बिसेन, दिपक उईके यांनी सहकार्य केले.