कुंभारटोली येथे सामाजिक न्याय दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 10:07 PM2018-04-19T22:07:52+5:302018-04-19T22:07:52+5:30
भारत सरकारच्या ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत तहसील कार्यालय व येथील नगर परिषदेच्या संयुक्तवतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी तालुक्यातील कुंभारटोली येथील समाज भवनात सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : भारत सरकारच्या ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत तहसील कार्यालय व येथील नगर परिषदेच्या संयुक्तवतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी तालुक्यातील कुंभारटोली येथील समाज भवनात सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला.
उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार साहेबराव राठोड, नायब तहसीलदार शिशुपाल पवार, एस.एम. नागपुरे, पं.स. उपसभापती जयप्रकाश शिवणकर, प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी एल.एल. कुटे, तालुका कृषी अधिकारी एल.एच. बन्सोड, कृषी अधिकारी सी.डब्ल्यू. वंजारे, सहाय्यक वनक्षेत्राधिकारी लेखराम भुते, पोलीस पाटील नर्मदा चुटे, संजय निराधार समिती अध्यक्ष सरोज कोसरकर, माजी सरपंच सुनंदा येरणे, माजी उपसरपंच निखील मेश्राम, तंटामुक्त समिती अध्यक्ष आशिक वैद्य, वनपाल समिती अध्यक्ष अशोक बोकडे, मंडळ अधिकारी कठाणे, तलाठी पटले, एस.आर. ब्राम्हणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
या अभियानांतर्गत तालुक्यातील कुंभारटोली, तिरोडा तालुक्यातील घोगरा व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंडी या तीन गावांची निवड करण्यात आली असून ‘सबका साथ, सबका गाव, सबका विकास’ या विशेष मोहिमेत प्रधानमंत्री उजाला योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना व मिशन इंद्रधनुष्य अशा सात योजनांचा समावेश आहे.
हे अभियान १४ एप्रिल ते ५ मे या कालावधीत सामाजिक न्याय दिवस, स्वच्छ भारत दिवस, उज्वला दिवस, राष्ट्रीय पंचायत राज दिवस, ग्राम स्वराज्य दिवस, आयुष्यमान भारत दिवस, किसान कल्याण दिवस, आजिवीका दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. उद्घाटनप्रसंगी सदर योजनांचा कुंभारटोली येथील नागरिकांनी लाभ घ्यावा असे अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी कळविले. प्रास्ताविक तहसीलदार राठोड यांनी मांडले. संचालन सहाय्यक गट विकास अधिकारी कुटे यांनी केले. आभार नायब तहसीलदार पवार यांनी मानले. यावेळी गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.