परसटोला येथे जागतिक वनदिन साजरा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:31 AM2021-03-23T04:31:21+5:302021-03-23T04:31:21+5:30

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांचे हस्ते तुळश बेल या वृक्षाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविकातून क्षेत्र सहाय्यक नान्हे यांनी वनाचे ...

Celebrating World Forest Day at Parastola () | परसटोला येथे जागतिक वनदिन साजरा ()

परसटोला येथे जागतिक वनदिन साजरा ()

Next

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांचे हस्ते तुळश बेल या वृक्षाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविकातून क्षेत्र सहाय्यक नान्हे यांनी वनाचे संवर्धन व संरक्षण करणे ही आपली जवाबदारी असल्याचे सांगून विविध वृक्षाचे विशेष महत्व सांगून वनसंरक्षण करण्याची शपथ घेतली. अध्यक्षीय भाषणामधून वन परिक्षेत्राधिकारी दर्शन पाटील यांनी वनांबरोबर आपले असलेले नाती कसे जपावे त्याचबरोबर वन्यप्राणी यांचे संरक्षण करुन वनाला कोणत्याही प्रकारची आग लागू नये. वनामध्ये मौल्यवान वनसंपत्ती असून ती राष्ट्रीय संपत्ती आहे. तिचे संरक्षण करणे प्रत्येक मानवजातीचे कर्तव्य आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या शेतमालाची जशी काळजी घेतो तशीच वनसंपत्तीची काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या आता मोहफुलाचा हंगाम सुरु आहे. वनाला आग लावण्याचे प्रकार घडत असतात, असे कोणीही करु नये, आगीच्या घटनेची माहिती त्वरित जवळच्या वन कार्यालयास देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन सोडगीर यांनी केले तर आभार वनरक्षक काळसर्पे यांनी मानले.

Web Title: Celebrating World Forest Day at Parastola ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.