जागतिक विज्ञान दिन साजरा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:55 AM2021-03-04T04:55:59+5:302021-03-04T04:55:59+5:30
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व डॉ.सी.व्ही. रमन यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन करण्यात आली. विज्ञानची परंपरा आणि प्राचीन काळापासून ...
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व डॉ.सी.व्ही. रमन यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन करण्यात आली. विज्ञानची परंपरा आणि प्राचीन काळापासून भारतीय सभ्यतांमध्ये विज्ञानाला महत्वपूर्ण स्थान होते आणि ते अजुनही आहे. विज्ञान शिवाय जीवन जगणे अशक्य आहे, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा, रंगोली स्पर्धा, भाषण स्पर्धा अशा स्पर्धाचे आयोजन सुध्दा करण्यात आले होते. त्याचप्रमाणे ऑनलाईन क्वीज स्पर्धा घेण्यात आली. यशस्वीतेसाठी प्रा. ए.एच.गुप्ता, प्रा.एस.बी.परिहार, प्रा. वाय. एम. थेर, प्रा. सुमित पटले, प्रा. लिल्हारे, प्रा.डी.बी.बिसेन, प्रा.नागपुरे, प्रा. बनोठे, सुनील दसरिया, भागेश्वरी नागपुरे, जयश्री शिवणकर, प्रमोद बनोठे, लोकेश मेश्राम यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन मिनाक्षी नागपुरे, पिंकी मच्छिरके आभार प्रा.कटरे यांनी मानले.