नवेगावबांध वनक्षेत्रात जागतिक वन दिवस साजरा (वनदिन)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:26 AM2021-03-24T04:26:52+5:302021-03-24T04:26:52+5:30

जंगलांबाबत आस्था आणि जंगलतोडीमुळे होणाऱ्या हवामानातील बदलांबद्दल चिंता वाटत असणाऱ्या सर्वांना जागतिक पातळीवर व्यासपीठ मिळावे, हा वनदिन साजरा करण्यामागचा ...

Celebration of World Forest Day in Navegaonbandh Forest Area (Forest Day) | नवेगावबांध वनक्षेत्रात जागतिक वन दिवस साजरा (वनदिन)

नवेगावबांध वनक्षेत्रात जागतिक वन दिवस साजरा (वनदिन)

Next

जंगलांबाबत आस्था आणि जंगलतोडीमुळे होणाऱ्या हवामानातील बदलांबद्दल चिंता वाटत असणाऱ्या सर्वांना जागतिक पातळीवर व्यासपीठ मिळावे, हा वनदिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. बदलत्या हवामानावर भविष्यात उपाययोजना करताना आणि धोरण ठरवताना जंगलांबाबत योग्य विचार होत असल्याची खात्री या मंचावरून एकत्रितपणे करता येईल. यासाठी वन दिवस साजरा केला जातो. त्यानुसार, सहवनक्षेत्र बाराभाटीअंतर्गत सोमलपूर येथे जागतिक वन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वनक्षेत्र अधिकारी रोशन दोनोडे व सहवनक्षेत्र अधिकारी करंजेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

तसेच भिवखिडकी येथेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला संयुक्त वनव्यवस्थापन समिती, सोमलपूर व भिवखिडकीचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते. अनावश्यक जंगलतोड टाळणे, अधिक झाडे लावणे, जंगलांपासून मिळणारी उत्पादने आणि होणारे फायदे, जंगलांना सतत भेट दिल्याने मिळणारी माहिती याबाबत जागतिक वन दिवसानिमित्त जनजागृती करण्यात आली.

Web Title: Celebration of World Forest Day in Navegaonbandh Forest Area (Forest Day)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.