शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवाचे आयोजन
By admin | Published: April 8, 2016 01:41 AM2016-04-08T01:41:49+5:302016-04-08T01:41:49+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन १० ते १४ एप्रिलपर्यंत करण्यात आले आहे.
पाच दिवसीय सोहळा : विविधांगी कार्यक्रम
बाराभाटी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन १० ते १४ एप्रिलपर्यंत करण्यात आले आहे.
यात १० एप्रिलला सकाळी धम्म रॅली काढण्यात येणार असून समता सैनिक दल व गावकरी सहभागी होतील. यानंतर समता इंटरटेनमेंट बुध्दभीम गीतांचा कार्यक्रम, उद्घाटन सत्र व मार्गदर्शन सोहळा होईल.
उद्घाटन सामाजिक न्याय व पालकमंत्री राजकुमार बडोले, साहित्यिक कविता मडावी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. अतिथी म्हणून दयाराम कापगते, रचना गहाणे, किशोर तरोणे, लीना डोंगरवार, गुलाब कोरेटी, धर्मेश जायस्वाल, महादेव बोरकर, ठाणेदार सुनील पाटील, नितीन राठोड, प्रा. बलवीर, के.एन. शहारे, विशाखा साखरे, नरूले, नितीन पुगलिया, जगदिश मोहबंशी, पचारे, रघुनाथ लांजेवार, मुलचंद गुप्ता, धम्मचारी गजभिये आदी उपस्थित राहतील.
वक्ते अॅड. भूपेंद्र रायपुरे, प्रा. जावेद पाशा कुरैशी, धम्मचारी अमृतसिध्दी मार्गदर्शन करणार आहेत.
सायंकाळी ७.३० वाजता वामनदादा कर्डक आंबेडकरी जलसा चंद्रपूरद्वारे ‘आम्ही तुफानातले दिवे’ सुलभा खोब्रागडे, बाबुराव जुमनाके, सचिन फुलझेले व संच सादर करतील. ११ एप्रिलला मुक्तांगण युवामंचतर्फे सायंकाळी ६.३० वाजता युगपुरुष महात्मा फुले जयंती यांची साजरी होणार आहे. अध्यक्षस्थानी के.ए.रंगारी राहतील.
अतिथी म्हणून दिनेश जांभूळकर, अश्वनी लांजेवार, एन.के. उके, यशवंत बोरकर, के.एम. भैसारे, दिगांबर रामटेके, एम.बी. इंदूरकर उपस्थित राहतील. सायंकाळी ७.३० वाजता भीमगीत, समूह नृत्यस्पर्धा होईल.
मंगळवार १२ एप्रिलला सायंकाळी ८.३० वाजता तीन अंकी नाट्य ‘स्वप्न भंगले सुखाचे’ तरूण मित्र मंडळ सादर करणार आहेत.
बुधवारी १३ एप्रिलला सकाळी ९ वाजता संपूर्ण ग्रामस्वच्छता अभियान होणार असून एस.एस. चव्हाण यांचा अंधश्रध्देवर कार्यक्रम होईल. रात्री ८.३० वाजता ‘युगपुरूष महात्मा ज्योतिबा फुले’ एकपात्री प्रयोग प्रा. रेवाराम खोब्रागडे सादर करणार आहे.
या वेळी नामदेव डोंगरवार, प्रा. मंगला गडकरी, लांजेवार, देविदास बडोले, सुमन शहारे, सुप्रिया डोंगरे, रेवचंद शहारे, हिंमत राऊत, लिला सांगोळकर उपस्थित राहतील.
गुरूवारी १४ एप्रिलला सकाळी ध्वजारोहण, भगवान बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दीप प्रज्वलन, सायंकाळी ४ वाजता धम्मरॅली तसेच झाकी निघणार आहे.
या पाच दिवसांच्या कार्यक्रमात मनोरंजनासह मार्गदर्शनाचा लाभही नागरिकांना घेता येईल.
या पाच दिवसीय विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन नवेगावबांध येथे करण्यात आले असून या कार्यक्रमांना परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष भास्कर बडोले, उपाध्यक्ष के.आर.उके, सचिव डी.डी.भालाधरे, कोषाध्यक्ष के.ए.रंगारी, सहसचिव एन.के.उके व सल्लागार राजकुमार उंदिरवाडे यांनी केले आहे. (वार्ताहर)