मेडिकल बिल काढून देण्यासाठी केंद्रप्रमुखाने मागितली ९ हजारांची लाच; एसीबीने पकडले रंगेहाथ

By अंकुश गुंडावार | Published: March 3, 2023 04:45 PM2023-03-03T16:45:53+5:302023-03-03T16:49:22+5:30

केंद्र प्रमुखाने घेतली ९ हजार रुपयांची लाच

Center chief took a bribe of 9 thousand rupees to clear the medical leave bill; ACB caught red-handed | मेडिकल बिल काढून देण्यासाठी केंद्रप्रमुखाने मागितली ९ हजारांची लाच; एसीबीने पकडले रंगेहाथ

मेडिकल बिल काढून देण्यासाठी केंद्रप्रमुखाने मागितली ९ हजारांची लाच; एसीबीने पकडले रंगेहाथ

googlenewsNext

गोंदिया : तिरोडा पंचायत समितीअंतर्गंत येत असलेल्या शिक्षण विभागातील गांगला केंद्राचे केंद्रप्रमुख व विषय शिक्षक धनपाल श्रीराम पटले (वय 47, रा. नेहरू वार्ड, तिरोडा) यांना 9 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. 

तक्रारदार हा भंडारा जिल्ह्यातील गणेशनपूर येथील रहिवासी असून हे शिक्षक असल्याने प्रकृती ठीक नसल्याने माहे डिसेंबर 2022 व जानेवारी 2023 मध्ये वैद्यकीय रजेवर होते. प्रकृती ठीक झाल्यावर ते जानेवारी 2023 मध्ये कर्तव्यावर हजर झाले.परंतु या वैद्यकीय रजा कालावधीतील त्यांचा पगार काढण्यात आला नसल्याने त्यांनी वैद्यकीय रजा मंजूर करून या कालावधीतील पगार काढणेकरिता गटशिक्षण अधिकारी,पंचायत समिती तिरोडा यांचेकडे कागदपत्रासह अर्ज केला. परंतु त्यांनी वैद्यकीय रजा मंजूर करून पगार काढला नाही.

आरोपी केंद्रप्रमुख याने तक्रारदारास गटशिक्षण अधिकारी यांचेकडून त्यांची वैद्यकीय रजा मंजूर करून त्या कालावधीतील पगार काढून देणेकरिता 10,000 रु. लाच रकमेची मागणी केली. तडजोडीअंती 9 हजार देण्याचे ठरले. सदर शिक्षकाने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यानंतर, आज(दि. ३) आरोपी तक्रारदाराकडून जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा, गांगला येथे लाच रक्कम स्वीकारताना एसीबीने सापळा रचून लाच स्वीकारताना केंद्र प्रमुखाला रंगेहाथ पकडले. आरोपीविरुद्ध तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रकिया सुरु करण्यात आली आहे. 

Web Title: Center chief took a bribe of 9 thousand rupees to clear the medical leave bill; ACB caught red-handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.