बोगारे कुटुंबीयांची चंद्रिकापुरे यांनी घेतली भेट ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:53 AM2021-03-13T04:53:49+5:302021-03-13T04:53:49+5:30

अजूनही गावालगत बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. वनविभागाने गस्त घालून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी नागरिकांनी ...

Chandrikapure visits Bogare family () | बोगारे कुटुंबीयांची चंद्रिकापुरे यांनी घेतली भेट ()

बोगारे कुटुंबीयांची चंद्रिकापुरे यांनी घेतली भेट ()

Next

अजूनही गावालगत बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. वनविभागाने गस्त घालून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. चिचटोला या गावातील संपूर्ण कुटुंब आदिवासी समाजातील असल्यामुळे ठक्कर बाबा योजनेतील रस्ते, शबरी घरकुल योजनेविषयी व आदिवासींना मिळणाऱ्या खावटी विषयी अशा अनेक समस्या आमदारांना सांगितल्या. गट ग्रामपंचायत वारव्ही, आंभोरा व चिचटोला या ठिकाणाहून १०० विद्यार्थी केशोरी येथे शिक्षणासाठी जात असतात. त्यामध्ये विद्यार्थिनींची संख्या अधिक असल्यामुळे त्यांना शाळेत येण्याजाण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने मानव विकासअंतर्गत केशोरी, बारव्ही, अंभोरा, चिचटोला मार्गे परसटोला बससेवा सुरु करण्याची मागणी केली. या गावासंबंधी आणि परिसरासंबंधी विविध समस्या ऐकून घेतल्या आणि घरकुलाचे प्रस्ताव, रस्त्याचे प्रस्ताव तयार करुन पाठविण्यास सांगून सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मयताच्या कुटुंबांना शासनाची मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले जाईल असेही चंद्रिकापुरे यांनी सांगितले. याप्रसंगी यशवंत गणवीर, योगेश नाकाडे, नामदेव पाटील डोंगरवार, अनिल लाडे, गुणवंत पेशने, मुरलीधर मानकर, निलकंठ बोगारे यांच्यासह गावातील नागरिक, महिला ज्येष्ठ मंडळी व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Web Title: Chandrikapure visits Bogare family ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.