रेल्वेगाडी वेळापत्रकात बदल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 09:26 PM2017-10-11T21:26:37+5:302017-10-11T21:26:49+5:30
अर्जुनी मोरगाव तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. जिल्हा मुख्यालयाशी म.रा. परिवहन महामंडळाशी थेट नाड न जुळलेला हा एकमेव तालुका आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : अर्जुनी मोरगाव तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. जिल्हा मुख्यालयाशी म.रा. परिवहन महामंडळाशी थेट नाड न जुळलेला हा एकमेव तालुका आहे. तालुक्याशी रेल्वेमार्ग जुडलेला आहे. मात्र रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कार्यालयीन कामकाजासंदर्भात जुळत नसल्याने जनतेची गैरसोय होत आहे. या वेळापत्रकात बदल करण्याची जनतेची मागणी आहे.
गोंदिया-बल्लारशा या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले. (५८८०२) ही गोंदिया-बल्लारशा पॅसेंजर ट्रेन गोंदिया रेल्वे स्थानकावरुन सकाळी ७.३० वाजता सुटत होती. मात्र ही गाडी डिझेल इंजिनऐवजी विद्युतीकरणावर गोंदिया ते नागभिडपर्यंत परिवर्तीत झाली. नागभिड येथे पुन्हा डिझेल इंजिन लावला जातो. यासाठी अर्धातास विलंब होत असल्याने गोंदिया येथून सकाळी ७.३० वाजता सुटणारी रेल्वेगाडी ७ वाजता करण्यात आल्याचे समजते. विद्युतीकरणाच्या नावाखाली करण्यात आलेल्या बदलामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही ट्रेन पूर्ववत सकाळी ७.३० वाजता गोंदिया रेल्वे स्थानकावरुन सोडण्याची मागणी आहे.
बल्लारशा येथून गोंदियाकडे परतीच्यावेळी (५८८०१) बल्लारशा-गोंदिया ही गाडी नेहमीच उशीरा सोडली जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. ही गाडी बल्लारशाऐवजी चांदाफोर्ट स्थानकावरुन सोडल्यास वेळ नियंत्रित केली जाऊ शकते. ही गाडी गोंदिया स्थानकाच्या आऊटरवर सुमारे तासभर थांबते. याची रेल्वे पोलिसांकडे तक्रार झाली आहे. या रेल्वे गाडीचे हिरडामाली स्थानकावरुन सायंकाळी ७.१६ वाजता प्रस्थान वेळ आहे व गोंदिया येथे पोहोचण्याची वेळ रात्री ८.३० वाजताची आहे. हिरडामाली ते गोंदिया हे केवळ १२ किमीचे अंतर कापण्यासाठी १ तास १४ मिनिटांचा कालावधी कसा? हा प्रश्न अन्नुत्तरित आहे. बल्लारशा-गोंदिया (५८८०३) रेल्वेगाडी बल्लारशा येथून सकाळी ५.३० वाजता सुटते. ही गाडी साधारणत: गोंदिया येथे ११.३० वाजता पोहोचते.
कार्यालयीन कामकाजासाठी जाणारे लोक तसेच कर्मचारी, विद्यार्थी व व्यापाºयांना ही वेळ गैरसोयीची ठरते. याऐवजी १०.३० वाजता गोंदिया येथे पोहोचल्यास सर्वांना सोईचे होईल. या वेळेवर ही गाडी पोहोचल्यास बालाघाटकडे जाणाºया प्रवाशांना गोंदिया रेल्वे स्थानकावरुन उपलब्ध होऊ शकते. या सर्व बाबींकडे लोकप्रतिनिधी व रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी रेल्वे प्रवाशी, विद्यार्थी, व्यापारी व दैनंदिन ये-जा करणाºया कर्मचाºयांनी केली आहे.