महापुरुषांचे विचार आत्मसात केल्याने परिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 10:21 PM2018-11-22T22:21:07+5:302018-11-22T22:21:45+5:30
भारतीय लोकांचा जर कोणी उद्धार करणार असेल तर बहुजन महापुरुषांच्या विचारानेच या देशातील भारतीय समाजात परिवर्तन होणार असे प्रतिपादन अजय काटेवार यांनी केले. आदिवासी समाज संघटना सहेसपुरच्यावतीने बिरसा मुंडा यांची १४३ वी जयंती व आदिवासी मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
एकोडी : भारतीय लोकांचा जर कोणी उद्धार करणार असेल तर बहुजन महापुरुषांच्या विचारानेच या देशातील भारतीय समाजात परिवर्तन होणार असे प्रतिपादन अजय काटेवार यांनी केले. आदिवासी समाज संघटना सहेसपुरच्यावतीने बिरसा मुंडा यांची १४३ वी जयंती व आदिवासी मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन अनिल वट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी चिरंजीव नागपुरे, सरपंच हितेश पताहे, उपसरपंच रिना कोल्हारे, विक्रम कोल्हारे,धनराज पताहे, बेनीराम गावळे, प्रवीण चौरागडे, छाया बावणकर, गीता भोयर, सयजा बिरनवार, कल्पना पटले, पोलीस पाटील कुवरलाल शेंडे, ईश्वरी पटले, शालीकराम कवरे, कुवरलाल राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गावात सकाळी प्रभातफेरी काढून व क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन करून करण्यात आली. तर दुपारी १ वाजता वट्टी यांच्या हस्ते उद्घाटन व काटेवार यांच्या अध्यक्षतेत क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करुन करण्यात आली.
प्रास्तावीक ग्राम सहेसपूरचे सरपंच हितेश पताहे यांनी मांडले. याप्रसंगी वट्टी यांनी बिरसा मुंडा यांचे जीवनचरित्र व संघर्ष या विषयी माहिती दिली. काटेवार यांनी, अंधश्रध्दा ही समाजात लागलेली मोठी किड आहे. या किडीच्या प्रभावातून बाहेर पडायचे असेल तर शिक्षण महत्वाचे आहे. शिक्षणाने मनुष्य विचार करायला लागतो व विचारातून तर्क करता येतो, यातून समाजाला जागरूक करता येत शिवाय अंधश्रध्देचा नायनाट करता येत असल्याचे मत व्यक्त केले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सायंकाळी सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सभापती पी.जी.कटरे, रंगमंच पूजन प्रकाश पटले यांच्या हस्ते जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राधेलाल पटले, राजू कटरे, संजय बावनकर उपस्थित होते.