खर्रा व तंबाखू विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:53 AM2021-03-13T04:53:18+5:302021-03-13T04:53:18+5:30
गोंदिया : सुगंधीत तंबाखू व खर्रा सर्रास विक्री केला जात असल्याने त्या तंबाखू विक्री करणाऱ्या दुकान व गोदामांवर धाडी ...
गोंदिया : सुगंधीत तंबाखू व खर्रा सर्रास विक्री केला जात असल्याने त्या तंबाखू विक्री करणाऱ्या दुकान व गोदामांवर धाडी घालण्यात आल्या. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी १० मार्च रोजी शहरात चार ठिकाणी धाड घालून एकाच दिवशी एक लाख ६२ हजार रूपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केला आहे. या संदर्भात दोघांवर गुरूवारी (दि.११) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीत गंजबाजार येथील मे. नामदेव पान भंडारचे मालक रिंकू नामदेवराव दादुरीया (३८,रा. क्षत्रीयमार्ग श्रीनगर वॉर्ड गोंदिया) व मे. कैलास वसंतराव क्षीरसागर (६०,रा. कृष्णपुरा वॉर्ड गोंदिया) यांचा समावएश आहे. या दोघांवर गोंदिया शहर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानदे कायदाचे कलम २६ (२) (आय) २६ (२) (आय व्ही) सहकलम २७ (३) (९) कलम ३ (१) (झेडझेड) (व्ही) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त ए.पी. देशपांडे, अन्न सुरक्षा अधिकारी शितल देशपांडे, पियुष मानवटकर, भास्कर नंदनवार यांनी केली होती.