आंतरिक लेखा परीक्षकांना मारहाण करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:53 AM2021-03-13T04:53:12+5:302021-03-13T04:53:12+5:30
गोंदिया : प्रवासाचे बिल न काढल्यामुळे झालेल्या वादातून नगर परिषदेच्या आंतरिक लेखा परीक्षकांना मारहाण करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर शहर पोलिसांत ...
गोंदिया : प्रवासाचे बिल न काढल्यामुळे झालेल्या वादातून नगर परिषदेच्या आंतरिक लेखा परीक्षकांना मारहाण करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (दि. १०) सायंकाळी ३.३० वाजतादरम्यान ही घटना घडली होती.
प्राप्त माहितीनुसार, नगर परिषद बाजार विभाग निरीक्षक मुकेश मिश्रा हे नगर परिषदेच्या कामाने व मुख्याधिकाऱ्यांच्या परवानगीने नागपूर येथे ३-४ वेळा खासगी वाहनाने गेले होते. या दौऱ्याचे बिल त्यांनी आंतरिक लेखा परीक्षक अतुल बद्धलवार (२६) यांच्याकडे मंजूर करण्यासाठी दिले होते. मात्र खासगी वाहनाने प्रवास अनुज्ञेय नसल्याने बिल काढता येणार नाही, असे बद्धलवार यांनी मिश्रा यांना सांगितले होते व बिल मंजूर न करता ठेवले होते. दरम्यान, बिलांवरून बुधवारी (दि. १०) सायंकाळी ३.३० वाजतादरम्यान वरिष्ठ लिपिक मुकेश मिश्रा व कंत्राटी कर्मचारी अजय मिश्रा या दोघांनी आंतरिक लेखा परीक्षक बद्धलवार यांच्या कक्षात जाऊन वाद घातला व मारहाण केली. या प्रकरणी शहर पोलिसांत भादंविच्या कलम ३५३, ३३२, १४९, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.