चटोपाध्याय व निवड श्रेणीतून तिरोडा तालुक्याला वगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:21 AM2021-07-18T04:21:26+5:302021-07-18T04:21:26+5:30
वडेगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या तिरोडा तालुका शाखेच्यावतीने चटोपाध्याय व निवड वेतन श्रेणी यादीत तालुक्यातील शिक्षकांची एकही ...
वडेगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या तिरोडा तालुका शाखेच्यावतीने चटोपाध्याय व निवड वेतन श्रेणी यादीत तालुक्यातील शिक्षकांची एकही नावे समाविष्ट न केल्याप्रकरणी हरकत नोंदवून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातून, मंगळवारी (दि.१३) प्रकाशित वरिष्ठ श्रेणी मंजूर यादीत तिरोडा पंचायत समिती अंतर्गत एकाही शिक्षकाचे नाव समाविष्ट नव्हते, याबाबतीत विचारणा करून खेद व्यक्त करण्यात आला. याविषयी लगेच हिवारे यांनी अधीक्षक जनबंधू यांना या प्रकरणाविषयी विचारणा केली. यावर जनबंधू यांनी संबंधित टेबलच्या लिपिकाने हलगर्जी केल्याने व स्थानांतरण होऊनही स्वत:कडे असलेला चार्ज इतरांकडे न दिल्याने अशी दुर्दैवी बाब घडल्याचे कबूल केले. हिवारे ही बाब अत्यंत गंभीर असून लगेच संबंधित लिपिकाचा चार्ज दुसऱ्याकडे सोपविण्याचे आदेश दिले. तसेच त्वरित पुढील चटोपाध्याय व निवडश्रेणी यादीत तिरोडा तालुक्यातील पात्र शिक्षकांची नावे समाविष्ट करण्याची हमी दिली.
उच्च परीक्षेला बसण्याची परवानगी व कार्योत्तर यादी यावरसुद्धा हिवारे यांनी जुलैअखेर यादी प्रकाशित होणार असे सांगितले. तसेच तिरोडा पंचायत समिती अंतर्गत ज्या शिक्षकांच्या सेवापुस्तिका जिल्हा परिषदेत आहेत, अशा सर्वच सेवापुस्तिका वार्षिक वेतनवाढीसाठी पंचायत समितीत घेऊन जावे व वेतनवाढीची नोंद करून कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेला परत आणून द्यावीत, असे गटशिक्षणाधिकाऱ्यांना फोनवरून कळविले. जीपीएफ पावत्यांच्या संदर्भाने देशमुख यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावर त्यांनी येत्या १५ दिवसात वर्ष २०१८-१९ च्या उर्वरित पावत्या व वर्ष २०१९-२० च्या नवीन पावत्या वितरित करण्याचे आश्वासन दिले. चर्चेला शिक्षक समितीचे शाखाध्यक्ष पी.आर.पारधी, कार्याध्यक्ष डी.एच.चौधरी, तालुका संघटक अशोक बिसेन प्रामुख्याने उपस्थित होते.
160721\5541img-20210716-wa0057.jpg
निवेदन सादर करताना समिती पदाधिकारी