नातेवाइकांना सोडायला जाणे स्वस्त : रेल्वे प्लॅटफाॅर्म तिकीट पुन्हा १० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:32 AM2021-09-18T04:32:00+5:302021-09-18T04:32:00+5:30
गोंदिया : रेल्वे विभागाने तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर प्लॅटफाॅर्म तिकीट दर ५० रुपयांवरून पूर्ववत १० रुपये केले आहे. यामुळे ...
गोंदिया : रेल्वे विभागाने तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर प्लॅटफाॅर्म तिकीट दर ५० रुपयांवरून पूर्ववत १० रुपये केले आहे. यामुळे नातेवाइकांना रेल्वे स्थानकावर सोडायला जाणे स्वस्त झाले आहे. प्लॅटफाॅर्म तिकीट दर ५० रुपये असल्याने तेवढ्या पैशात तिकीट काढून नातेवाइकाला त्याच्या गावी जाऊन सोडणे परवडत होते. मात्र, प्लॅटफाॅर्म तिकीट काढणे परवडत नव्हते. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेत रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने प्लॅटफाॅर्म तिकीट दर १० रुपयांवरून ५० रुपये केले होते. त्यामुळे रेल्वे स्थानकावर नातेवाईक व मित्र परिवाराला सोडणे चांगलेच महागडे झाले होते. मागील सहा महिन्यांपासून प्लॅटफाॅर्म तिकीट दर ५० रुपये होते. प्लॅटफाॅर्म तिकीट दर पूर्ववत करण्याची मागणी वाढल्यानंतर रेल्वेने ते दर पूर्ववत १० रुपये केले आहे.
दररोज २०० प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री
- गोंदिया रेल्वे स्थानकावरून दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या ७ ते ८ हजार आहे.
- या रेल्वे स्थानकावरून दररोज २०० हून अधिक प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री
- प्लॅटफाॅर्म तिकीट दरात रेल्वे विभागाने वाढ केल्याने प्लॅटफाॅर्म तिकीट विक्री ४० ते ५० वर आली होती.
- जेवढा दर प्लॅटफाॅर्म तिकिटाचा आहे तेवढ्याच पैशात नातेवाइकाला तुमसरपर्यंत रेल्वेने सोडून येणे शक्य होते.
................
आठ महिने बसला भुर्दंड
कोरोना संसर्गामुळे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफाॅर्म तिकिटाच्या दरात वाढ केली होती. जवळपास आठ महिने प्लॅटफाॅर्म तिकिटाचे दर कायम होते. त्यामुळे यातून रेल्वे विभागाला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाला, तर प्रवाशांना भुर्दंड सहन सहन करावा लागला.
............
सुरू असलेल्या रेल्वे गाड्या
- गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस
-गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस
- हावडा-अहमदाबाद
- हावडा-मुंबई मेल
- छत्तीसगड-अमृतसर एक्स्प्रेस
- समता एक्स्प्रेस
...............