छत्तीसगड एक्स्प्रेस आजपासून रद्द
By admin | Published: July 5, 2017 12:37 AM2017-07-05T00:37:49+5:302017-07-05T00:37:49+5:30
उत्तर रेल्वे अंंतर्गत दिल्ली-मेरठ-सहारनपूर व मेरठ-दौरला स्थानकांवर नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जाणार असल्याने ....
नॉन इंटरलॉकिंगचे कार्य : आठ दिवस राहणार रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उत्तर रेल्वे अंंतर्गत दिल्ली-मेरठ-सहारनपूर व मेरठ-दौरला स्थानकांवर नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जाणार असल्याने बुधवारपासून (दि.५) बिलासपूर-अमृतसर (१८२३७) छत्तीसगड एक्स्प्रेस रद्द केली जाणार आहे. मंगळवारपासून (दि.४) मेरठ सिटी, मेरठ कँट, पबली खा, व दौरला स्थानकांवर नॉन इंटरलॉकींगचे काम केले जाणार आहे. त्यामुळे दक्षिण-पूर्व- मध्य रेल्वेची गाडी बिलासपूर-अमृतसर छत्तीसगड एक्स्प्रेस (१८२३७) बुधवारपासून (दि.५) पुढील बुधवारपर्यंंत (दि.१२) रद्द करण्यात आली आहे. तर अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेस (१८२३८) शुक्रवारपासून (दि.७) पुढील शुक्रवारपर्यंत (दि.१४) रद्द राहणार आहे.